
कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकाची कौशल्यपुर्ण सुपरफास्ट कामगिरी…
पुणे (संदीप कद्रे): कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकाने कौशल्यपुर्ण सुपरफास्ट कामगिरी करत नेहमीच शिवीगाळ करणा-या दारुड्या मित्राचा खुन करणा-या आरोपीस ८ तासात जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
कोंढवा पोलिस ठाणेच्या हद्दीत कामठे पाटील नगर येथील हातीमी हिल्स सोसायटीच्या मागील निर्जळ स्थळी एका व्यक्तीच्या तोंडावर व मारहाण करुन, गळा आवळून खुन करुन बॉडी फेकून देण्यात आल्याची घटना मंगळवारी (ता. ९) घडली होती. खुन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेवून ताब्यात घेण्याबाबतच्या सुचना वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिल्या होत्या. अज्ञात आरोपीचा शोध घेण्याकामी कोंढवा पोलिस ठाणेकडील दोन पथके रवाना करण्यात आली होती. सहा. पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे व सहा पोलिस निरीक्षक दिनेश पाटील हे तपास पथकातील अंमलदार यांच्यासह अज्ञात आरोपी यांचा शोध घेत होतो.
मृतदेहाजवळ कोणतेही ओळखपत्र तसेच अंगावर गोदलेले नसताना मयताचे कपडे तपासले असता त्यामध्ये देखील कोणतेही टेलर मार्क दिसुन आले नाही. मयताची ओळख पटविण्याची आव्हान पोलिसाच्या समोर असताना प्रथम मयत बॉडी ही नसीम सइदुल्लाह खान (वय ३७ वर्षे, रा. लेबर कॅम्प, कामठेनगर, पुणे मुळ रा. उत्तरप्रदेश) यांची असल्याची माहिती निष्पन्न केली गेली. तेव्हा सदर व्यक्तीचा कोणाशी वाद आहे का? कोणाशी भांडणे झाली आहे का ? याबाबत तपास केला असता काही एक उपयुक्त माहिती मिळाली नाही. त्याचप्रमाणे घटनास्थळी कोणत्याही प्रकारचे सीसीटीव्ही फुटेज, प्रत्याक्षदर्शी साक्षीदार अगर तात्रिक तसेच परिस्थितीजन्य पुरावा प्रथमदर्शनी मिळून न आल्याने पोलिसासाठी आरोपीबाबत माहिती मिळवीने आव्हानात्मक झाले. अशा प्रतिकुल परिस्थितीत सदर घटनास्थळा जवळील वस्तीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने त्याचा घात केला असल्याबाबत संशय बळविल्याने कमल रोहित ध्रुव (वय १९ वर्षे, रा. लेबर कॅम्प, कामठेनगर, पुणे मुळ रा. छत्तीसगड) यास ताब्यात घेवून त्याच्याकडे तपास केला असता त्याने पहिल्यादा उडवाउडवीची उत्तरे दिली. पंरतु, त्यास पोलिस खाक्या दाखवुन वेळप्रसंगी भावनिक प्रश्न विचारून चौकशी केली असता त्याने मयत नसीम सइदुल्लाह खान हा त्यास दारु पिवुन रोजच शिवीगाळ करीत होता. तसेच घटनेच्या दिवशी देखील मयताने त्यास पुन्हा शिवीगाळ करुन बाहेर निघून गेला होता. तेव्हा कमल रोहित ध्रुव याने त्याच्या पाठोपाठ हातीमी हिल्स सोसायटीच्या मागील निर्जळ स्थळी जावुन प्रथम हाताने गळा आवळून व नंतर तोंडावर दगड मारुन जखमी करुन खून केल्याची कबुली दिली आहे.
संबंधित कामगिरी पोलिस आयुक्त रितेशकुमार, रंजन शर्मा, अपर पोलिस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग, आर राजा, पोलिस उप आयुक्त सो परि.०५, शाहुराव साळवे, सहा. पोलिस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, संदिप भोसले, पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे, सहा. पोलिस निरीक्षक दिनेश पाटील, पो.हवा. अमोल हिरवे, पो हवा विशाल मेमाणे, पो हवा लवेश शिंदे, पो हवा निलेश देसाई, पो हवा सतीश चव्हाण, पो शि शाहिद शेख, पो शि संतोष बनसुडे, पो. शि. जयदेव भोसले, पो. शि. विकास मरगळे, पो.शि.शशांक खाडे,पो. शि. रोहित पाटील, पो. शि. राहुल थोरात, पो. शि.अभिजीत रत्नपारखी, पो.शि.आशिष गरुड, पो.हवा.राहुल वंजारी, पो. शि. सुहास मोरे, पो शि सुरज शुक्ला पो शि लक्ष्मण होळकर, पो शि ज्ञानेश्वर भोसले यांनी केली आहे.
कोंढवा पोलिसांना नंबर प्लेटवरील नंबर खोडलेला दिसला अन् गुन्हे केले उघड…
कोंढवा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईतांकडून ७ पिस्टल अन् काडतुसे जप्त…
कोंढवा पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस १० तासात केली अटक…
कोंढवा पोलिसांनी सापळा रचून केली अटक; १५ दुचाकी जप्त…
कोंढवा पोलिसांनी गंभीर गुन्हयातील फरारी आरोपींना केले जेरबंद…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

