
दुचाकी अपघातात तीन युवकांचा जागीच मृत्यू; दुचाकीचे दोन तुकडे…
गडचिरोली : गडचिरोली-चंद्रपूर मार्गावर मुरखळा गावाजवळ मंगळवारी (ता. ९) रात्री ९ च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन युवकांचा मृत्यू झाला आहे. तिघे युवक एकमेकांचे नातेवाईक असन, त्यांची वये २० ते २३च्या दरम्यान होती. पोलिस पुढील तपास करत आहेत.
नवीनच घेतलेल्या दुचाकीवरून तिन्ही युवक गडचिरोलीच्या दिशेने येत होते. मुरखळा गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकला जोरात धडक बसली. या अपघातात तिन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला. अक्षय दशरथ पेंदाम, अजित रघू सडमेक, अमोल अशोक अर्का (सर्व रा. गोविंदगाव, ता. अहेरी) अशी मृत युवकांची नावे आहेत. तीन युवकांचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात शोककळा पसरली आहे.
एकमेकांचे नातेवाईक असलेल्या युवकांच्या निधनाने नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी निघालेल्या सहा मित्रांचा अपघाती मृत्यू…
अहमदनगरमध्ये दर्शनासाठी जाताना भीषण अपघात; 3 ठार 8 जखमी…
साईबाबांचे दर्शनानंतर समृद्धी महामार्गावरून जाताना भीषण अपघात…
बार्शी-धाराशिव मार्गावर भीषण अपघात; तिघा मित्रांचा जागीच मृत्यू…
अपघातानंतर धडक देऊन पळ काढल्यास कठोर शिक्षा: गृहमंत्री
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

