गँगस्टर शरद मोहोळ याचा CCTVसमोरच का केला खून…

पुणे : कोथरूड येथे गँगस्टर शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशीच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. पण, आरोपींनी सीसीटीव्ही असलेल्या परिसरातच खून केला. यामागे त्यांचा उद्देश दहशत निर्माण करण्याचा होता असं तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले.

गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणी न्यायालयाने आरोपींची पोलिस कोठडी आणखी ७ दिवस वाढवली आहे. हल्लेखोरांनी मुळशी तालुक्यात दोन ते तीन ठिकाणी गोळीबाराचा सराव केला. त्याची माहिती घ्यायची आहे आणि ठिकाणे शोधायची आहेत. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे आणि आर्थिक व्यवहारसुद्धा झाला असून आरोपींच्या बँक खात्याची माहिती घ्यायची आहे. आरोपींची पोलिस कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात केली होती.

कट रचण्यासाठी आरोपींना मदत कोणी केली. त्यामागचा मास्टरमाइंड कोण आहे? कारण नेमकं काय आहे? याची माहिती शोधायची आहे, असेही तपास अधिकारी म्हणाले. पोलिसांनी या प्रकरणी ८ जणांना अटक केली असून त्यापैकी ६ जणांना न्यायालयाने १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींची पोलिस कोठडी वाढवण्यासाठी जुनीच कारणे दिली जात आहेत. बँक स्टेटमेंट, सीसीटीव्ही चित्रीकरण आदी तांत्रिक पुरावे पडताळण्यासाठी आरोपींची पोलिस कोठडी गरजेची नाही, असे आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.

दरम्यान, आरोपींनी सीसीटीव्ही असलेल्या परिसरातच खून केला. यामागे त्यांचा उद्देश दहशत निर्माण करण्याचा होता असं तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले. आरोपींना एका व्यक्तीने सीमकार्ड दिला असून त्यावरून आरोपींनी कॉल केले आहेत. ज्याने सीमकार्ड दिले त्याचा शोध घ्यायचा आहे. तसेच आरोपींनी रिक्षाचा वापर केला. त्या रिक्षाचालकालाही शोधायचे आहे. त्यामुळे आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करावी, अशी मागणी तपास अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.

मुळशी पॅटर्न! गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्येमागची INSIDE STORY…

शरद मोहोळची पत्नी कडाडली; नवरा वाघ होता तर मी वाघीण आहे…

कुख्यात गुंड शरद मोहोळ प्रकरण! पोलिसांनी आवळल्या आठही जणांच्या मुसक्या…

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशी हल्ल्यात मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!