
पुणे शहरात कंपनीत एचआर पदावर काम करणाऱ्या युवतीवर बलात्कार…
पुणे : पुणे शहरातील एका कंपनीत एचआर पदावर काम करत असलेल्या युवतीला भेटण्यासाठी बोलवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. ६) दुपारी तीनच्या सुमारास खराडी येथील एका अपार्टमेंटमध्ये घडली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एका युवकावर गुन्हा दाखल केला आहे.
वडगाव शेरी येथे राहणाऱ्या २४ वर्षीय पीडित युवतीने मंगळवारी (ता. ९) चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून प्रवीण हराळ (वय २८, रा. नऱ्हे आंबेगाव, पुणे) याच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती ही एका मॅनेजमेंट कंपनीत एचआर पदावर काम करत आहे. आरोपी प्रवीण याने फिर्यादी एचआर पदावर काम करत असताना तिच्या सोबत मैत्री केली. प्रवीण याने शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास खराडी येथील एका अपार्टमेंटमध्ये युवतीला भेटण्यासाठी बोलवून घेतले होते. आरोपीने ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्या घरातील लोकांना समजले की, तुझ्याशी मी लग्न करतो’ असे आमिष दाखवले. त्यानंतर प्रवीण हराळ याने युवती सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. घाबरलेल्या युवतीने मंगळवारी पोलिस ठाण्यात आरोपी प्रवीण हराळ याच्या विरोधात तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणारे तिघे अखेर अटकेत…
यवतमाळ जिल्ह्यातील विधवा महिलेवर पुण्यात बलात्कार; गुन्हा दाखल…
बीड हादरलं! चिमुकलीवर पडक्या रूममध्ये सामूहिक बलात्कार…
युवतीवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार; व्हिडिओ व्हायरल…
सासऱ्याने केला सुनेवर बलात्कार; तक्रार दाखल…

