अश्लील व्हिडिओ माझ्याकडे असल्याचे केअर टेकर मुलगी म्हणाली अन्…

मुंबई: खार परिसरात घरात एकटे राहणाऱ्या वृद्ध नागरिकांना अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपये खंडणी मागणाऱ्या चार जणांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात खार पोलिसांना यश मिळाले आहे. खार पोलिसांनी याप्रकरणी केअर टेकर मुलगी आणि तिच्या इतर साथीदारांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

नीतू (वय 20), अनिल चौहान (वय 32), किरण नायर (वय 24) आणि राजेश केवट (वय 34) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. खार परिसरात घरात एकटेच राहणाऱ्या विपीन शेठ यांनी आठ दिवसापूर्वी आपली देखभाल करण्यासाठी एक केअर टेकर मुलीची एजन्सी मार्फत नेमणूक केली होती. पण, मुलीच्या वर्तवणुकीचा संशय आल्याने आठ दिवसानंतर विपीन शेठ यांनी त्या मुलीला आठ दिवसांचा पगार आणि अधिकचे पाचशे रुपये देऊन उद्यापासून कामावर येऊ नको असे सांगितले. पगार घेऊन गेल्यानंतर केअर टेकर मुलीने दुसऱ्या दिवशी फोन करून तुमचा अश्लील व्हिडिओ माझ्याकडे आहे. तुम्ही जर मला तीस हजार रुपये दिले नाहीत तर तो व्हिडिओ मी व्हायरल करेन, असे सांगितले. यावर तू माझ्या मुलीसारखी आहेस असे काय बोलतेस? असे फिर्यादी सेठ यांनी त्या केअर टेकर मुलीला म्हटले. यावर पुन्हा त्या मुलीला कामावर ठेवणाऱ्या एजंटने फोन करून सेठ यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली.

विपीन सेठ यांनी याबाबत खार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी खार पोलिसांनी कलम 385, 34 भादवि नुसार गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन खार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या अधिकारी आणि अंमलदार यांनी सापळा रचून केअरटेकर नीतू आणि एजंट यांना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला व या गुन्ह्यात अजून दोन जणांचा देखील समावेश असल्याचे उघडकीस आले. यानंतर त्या दोघांनाही खार परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

लष्करातून निवृत्त झालेल्या वृद्धाला अश्लिल व्हिडिओ कॉल अन्…

युवकाला दिली अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी अन्…

प्रियकरासह त्याच्या मित्रांनी विद्यार्थिनीचे न्यूड फोटो केले व्हायरल…

धक्कादायक! अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार…

पत्नीबाबत अश्लिल बोललेल्या मित्राला पुलावरून फेकले खाली अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!