कंपनीची सीईओ असलेल्या आईने केला चिमुकल्याचा खून; कारण…

पणजी (गोवा): एका स्टार्टअप कंपनीची सीईओ असलेल्या सूचना सेठ या महिलेने स्वतःच्या चार वर्षांच्या चिमुकल्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंगळुरूतून ती गोव्यात आली होती. गोव्यात हत्या केल्यानंतर बंगळुरूला मुलाचा मृतदेह बॅगेत भरून कॅबने जात असताना तिला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

सूचना सेठ ही महिला एका स्टार्टअप कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. तिने चार वर्षांच्या मुलाची गोव्यात हत्या केली. त्यानंतर मृतदेह बॅगेत भरून टॅक्सीने कर्नाटकात निघाली होती. गोवा पोलिसांनी आरोपी सूचना सेठ हिला सोमवारी रात्री कर्नाटकातील चित्रदूर्ग इथून अटक केली. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, मंगळवारी तिला गोव्यात आणले आणि मापुसा शहरातील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला सहा जानेवारीला मुलाला घेऊन गोव्यात आली होती. दोन दिवस राहिल्यानंतर ती सोमवारी टॅक्सीने बंगळुरूला गेली. अपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं की, ती मुलासोबत आली होती पण जाताना तिच्यासोबत मुलगा नव्हता. हत्येचे नेमकं कारण स्पष्ट झालेले नाही. पण, महिला घटस्फोटीत आहे. मुलाला नवऱ्याला भेटता येऊ नये म्हणून हत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. दरम्यान, रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मुलाचा मृत्यू तोंड आणि नाक दाबल्यामुळे त्याचा श्वास गुदमरून मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

माता तू न वैरिणी! चिमुकलीला 14व्या मजल्यावरून फेकलं…

माता न तू वैरिणी! आईने चिमुकलीच्या नाकाला चिमटा लावला अन्…

माता न तू वैरिणी! अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा म्हणून चिमुकल्याचा खून…

माता न तू वैरिणी! मुलीला जिवंत जाळून मारलेस, तर तुला धनलाभ होईल…

धक्कादायक! आरोपी निघाला पीडित युवतीचा सख्खा मावस भाऊ…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!