पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीकडून पकडल्या ११ मोटारी; पाहा क्रमांक…
पुणे (सुनिल सांबारे): आंतरराज्यीय टोळीकडून दिल्ली येथील चोरीच्या चारचाकी गाडयांची महाराष्ट्रात बनावट कागदपत्रांव्दारे विक्री करणाऱ्या टोळीला दरोडा विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. पिंपरी-चिंचवडच्या दरोडा विरोधी पथकाने आरोपींकडून १,५७,००,००० रुपये किंमतीच्या ११ चार चाकी गाडया हस्तगत केल्या आहेत. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे हददीतील वाहन चोरीच्या अनुषंगाने वरीष्ठांचे आदेशाने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे दरोडा विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार […]
अधिक वाचा...बीडमध्ये भीषण अपघातात पाच जागीच ठार; गावावर शोककळा…
बीड : अहमदनगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या मांजरसुंब्या ससेवडी गावाजवळ कंटेनर व पिकपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नेकनूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत. ससेवाडी गावाजवळ कंटेनर आणि पिकअपची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. पाच जणांचा जागीच […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातील पोलिसकाकाचा हृदयविकाराने मृत्यू….
चाकण (पुणे) : चाकण पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले सहायक फौजदार बाबूराव मानसिंग राठोड (वय ५०) यांचा ब्रेन हॅमरेज (मेंदूतील रक्तस्राव) झाल्याने आणि हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. राठोड यांच्या मृत्युमुळे पोलिस दलातील सहकाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड हे सोमवारी (ता. ८) रात्री ड्युटीवर […]
अधिक वाचा...पुणे शहरात वाहन चोरी करणाऱ्या सराईतास युनिट ६ गुन्हे शाखेने केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस युनिट ६ गुन्हे शाखेने जेरबंद केले असून, त्याच्याकडून एकुण ०४ गुन्हे उघड केले आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. गुन्हे शाखा युनिट-६ कडील पोलिस अंमलदार हे युनिटचे हद्दीत १०/०१/२०२४ रोजी पेट्रोलिंग करीत होते. युनिट कडील पोलिस अंमलदार, सकटे व मुंढे यांना खात्रीशीर बातमी मिळाली […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! तलावाजवळ मुलांची कपडे दिसली अन् फुटला हंबरडा…
छत्रपती संभाजीनगर: वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील एका तलावात बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक गुरुवारी (ता. ११) दुपारी घडली आहे. बिस्वजित सुखदेव उपाध्याय कुमार (वय 12), अफरोज जावेद शेख (वय 12), जावेद शेख (वय 14), अबरार जावेद शेख (वय 12) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चार मुलांची नावे आहेत. यामळे कुटुंबियांवर शोककळा पसरली […]
अधिक वाचा...शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी नवी माहिती समोर…
पुणे : शरद मोहोळ हत्या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोरांना शस्त्रे पुरवणाऱ्या दोघांना अटक केली असल्यामुळे अटक करण्यात आलेल्यांची संख्या दहा झाली आहे. आरोपींसोबत अटक केलेल्या वकिलांचे खूनापूर्वीच आरोपींशी बोलणे झाल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. ऑक्टोबरमध्ये पहिल्या आठवड्यात हल्लेखोरांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पण तो अपयशी ठरला होता. त्यावेळी आरोपींसोबत दोन्ही वकिलांची पिरंगुट येथे बैठक […]
अधिक वाचा...कुटुंबच संपलं! दुचाकी अपघातात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू…
हिंगोली : हिंगोलीच्या डिग्रस वाणी ते सिरसम रस्त्यावर दुचाकीला झालेल्या अपघातात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू झाला आहे. अपघातात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दुचाकीवरून तिघेजण सिरसम येथे रुग्णालयात जात असताना ही दुर्घटना घडली आहे. कुंडलिक जाधव, आकाश जाधव व कलावती जाधव अशी मृतांची नावे आहेत. या […]
अधिक वाचा...बिबवेवाडी पोलिसांनी दुकानात चोरी करणाऱ्या आरोपीस केले जेरबंद….
पुणे (संदीप कद्रे): बिबवेवाडी पोलिसांनी दुकानाचा दरवाजा तोडून चोरी करणाऱ्या आरोपीस जेरबंद केले आहे. आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरी केलेली रक्कम 3,82,000 रुपये व गुन्हा करण्यासाठी वापरलेला फ्लाय कटर हा जप्त केला आहे. सहा. पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे यांनी तपास उघड केला असून, पुढील तपास करत आहेत. विलास तुकाराम आधवडे (वय ४९ वर्षे, धंदा व्यवसाय रा.एच […]
अधिक वाचा...माजी नगरसेवकावर भरदिवसा गोळीबार…
गोंदिया: माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर आज (गुरुवार) भरदिवसा गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात लोकेश यादव हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. हल्ल्यातील मारेकऱ्यांची ओळख पटली नसून मारेकऱ्यांचा शोध पोलीस घेत आहे. लोकेश उर्फ कल्लू यादव हे माजी नगरसेवक असून ते अनेक सामाजिक कार्यात सक्रीय आहे. […]
अधिक वाचा...सुनील केदार यांचे जंगी स्वागत करणाऱ्या 100 जणांवर गुन्हा दाखल…
नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणी शिक्षा झालेल्या सुनील केदार यांची बुधवारी (ता. १०) जामिनावर सुटका झाली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत कार्यकर्त्यांनी केले. या प्रकरणी नागपूरमधील धंतोली पोलीस स्टेशनमध्ये १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. सुनील केदार यांची सुटका झाल्यानंतर रॅली काढू नये, असे पोलिसांनी सांगितले […]
अधिक वाचा...
