सलमान खानसोबतचा वाद संपलेला नाही; त्याच्याबरोबर काम करणाऱ्यांना संपवू – लॉरेन्स बिश्नोईची पुन्हा धमकी…

मुंबई: रविवारी मुंबईत टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर काही मिनिटांतच, एक ध्वनिफीत सोशल मीडियावर प्रसारित होऊ लागली. त्यात लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार अनिल पंडितने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. तो म्हणाला, ‘मी अनिल पंडित, लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ आहे. आज मुंबईत टायगर श्रॉफसोबत जे घडले, त्याची जबाबदारी मी आणि हरमन संधू घेतो’. या ध्वनिफीतीमध्ये अनिलने असा दावा केला, […]

अधिक वाचा...

उल्हासनगरमधील एकाच घराला दिवसातून दोन वेळा लागली आग; ज्येष्ठ महिलेची सुटका…

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये एकाच घराला अवघ्या काही तासांच्या अंतराने दोन वेळा आग लागल्याची घटना घडली आहे. घरात उपस्थित असलेल्या एका ज्येष्ठ महिलेची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, एकाच घराला वारंवार आग लागण्याच्या घटनांमुळे परिसरात चिंतेचे वातावरण आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक ५ मधील सेक्शन ३९ परिसरात, बॅरेक क्रमांक १८५५ समोरील […]

अधिक वाचा...

दहा वर्षे वयाच्या मुलीने १८ महिन्यांच्या बाळाला सहाव्या मजल्यावरून फेकून दिले; दिंडोशी पोलिंसाकडून गुन्हा दाखल…

मुंबई: मुंबईतील गोरेगाव पूर्व परिसरात एका १० वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीने अवघ्या १८ महिन्यांच्या बाळाला इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील डक्टमधून खाली फेकून दिले. या घटनेत बाळाचा मृत्यू झाला आहे. दिंडोशी पोलिसांनी या मुलीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी, की गेल्या १४ ऑक्टोबर रोजी रात्री गोरेगाव पूर्व येथील नागरिक निवारा (दिंडोशी) परिसरात असलेल्या […]

अधिक वाचा...

शिवा शर्मा हत्याकांडातील मुख्य सूत्रधार श्रद्धा दुबे हिला नागपुरात अटक…

नागपूर: लखनौमध्ये (उत्तर प्रदेश) झालेल्या शिवा शर्मा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी मॉडेल श्रद्धा दुबे हिला नागपुरातून अटक करण्यात आली आहे. तिच्यासह तिची बहीण आणि चालकादेखील बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल श्रद्धा दुबे, तिची बहीण रश्मी दुबे आणि त्यांचा चालक तन्वीर अली ऊर्फ दानिश यांना नागपुरात अटक करण्यात आली आहे. […]

अधिक वाचा...

सातारा! महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलेल्या चार मित्रांचा अपघाती मृत्यू; पाहा नावे…

सातारा: कराड शहराजवळ पुणे-बेंगलोर महामार्गावर उड्डाणपूलावर मंगळवारी (ता. २०) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओ आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये साताऱ्यातील चार युवकांचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व युवक कोल्हापूरच्या महालक्ष्मीला दसऱ्यानिमित्ताने दर्शनाला गेले होते. त्यानंतर घरी परत येत असताना हा भीषण अपघात झाला आहे. अपघातातील सर्व युवक […]

अधिक वाचा...

नाशिक! भोंदूबाबाने पीडितेसोबत नको-नको ते केलं; अर्धनग्न पूजा अन्…

नाशिक : एका भोंदूने आजाराने त्रस्त झालेल्या महिलेचा पूजाविधीने आजार बरा करणे आणि दैवी व अघोरी शक्तीने पैशाचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडितेला अर्ध नग्न अवस्थेत बसवून पूजा केली आणि साडेसात लाख रुपयांचा गंडा घातला आहे. दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या भोंदूबाबा विरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात […]

अधिक वाचा...

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाबाबत पोलिस उपायुक्तांकडून महत्त्वाची माहिती…

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना राजस्थानच्या कोटा शहरातून मुंबईत आणण्यात येत आहे. त्यानंतर, पोलिस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. जुहूमध्ये अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या कारवर काल (रविवार) गोळीबाराची घटना घडली, दुचाकीवरुन आलेल्या तिघांपैकी दोघांनी गोळीबार केला आणि ते घटनास्थळावरुन […]

अधिक वाचा...

रिलायन्सच्या चाकण गोदामात उंदीर व झुरळे; चांगली आणि मुदतबाह्य व खराब उत्पादनांची साठवणूक एकत्र…

पुणेः महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) रविवारी सलग दुसऱ्या दिवशी रिलायन्स रिटेलवर कारवाई केली असून, पुणे जिल्ह्यातील चाकण येथील त्यांच्या गोदामाचा आणि निगोजे येथील ब्लिंकइटशी संबंधित एका युनिटचा परवाना निलंबित केला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘एफडीए’ने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की तपासणीदरम्यान उंदीर आणि झुरळांचा प्रादुर्भाव, अयोग्य साठवणूक आणि मुदत संपलेल्या अन्न उत्पादनांच्या […]

अधिक वाचा...

पुणे-बंगळुरू महामार्गावरील सिनेस्टाईल लूट; कुरिअर कंपनीच्या व्हॅनमधून दीड कोटींचा ऐवज लंपास; १२ तासांत लुटारू गजाआड…

साताराः पुणे-बंगळुरू महामार्गावर कुरिअर कंपनीची व्हॅन अडवून सिनेस्टाईल दरोडा घालून, सुमारे दीड कोटी रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या आठ जणांच्या टोळीला पोलिसांनी अवघ्या १२ तासांत जेरबंद केले. एका कुरिअर कंपनीत कामाला असलेल्या कर्मचाऱ्यानेच दरोड्याचा कट आखल्याचे तपासात समोर आले. दोन डीवायएसपी, सात एपीआय, पीएसआय दर्जाच्या अधिकाऱ्यांसह तब्बल ७० पोलिसांनी अहोरात्र तपास करून या गुन्ह्याचा […]

अधिक वाचा...

टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्या तिघांनाही कोटामध्ये अटक; आरोपींपैकी एक जण बिहारचा तर दोघे हरियाणाचे…

मुंबईः अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार करणाऱ्या तिन्ही नेमबाजांना राजस्थानच्या कोटा येथे अटक करण्यात आली आहे. तिघांचीही चौकशी सुरू आहे. रविवारी त्याच्यावर गोळीबार करणाऱ्यांमध्येच यांपैकी दोघे जण असल्याचा संशय आहे. पोलिस सूत्रांनुसार, टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी कोटा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. या तिघांची चौकशी सुरू असून, त्यापैकी दोघांनीच रविवारी अभिनेत्यावर गोळीबार केल्याचे वृत्त […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!