खडक पोलिस स्टेशन हद्दीतील सराईत गुंडावर एम.पी.डी.ए अंतर्गत कारवाई…

पुणे (संदीप कद्रे): खडक पोलिस स्टेशन हद्दीतील सराईत गुंड नजीर सलीम शेख यास एम.पी.डी.ए कायद्यातंर्गत अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे एक वर्षाकरीता स्थानबध्द केले आहे. आगामी लोकसभा, विधान सभा निवडणूक २०२४ ही पुणे शहरात निर्विघ्न व शांततेत पार पाडणे कामी व पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसविण्याकरिता पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी कडक पावले उचलली असून, त्यासाठी पुणे शहरातील सराईत गुन्हेगारावर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश पुणे शहरातील सर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना दिलेले आहेत.

खडक पोलिस स्टेशन पुणे चा गुन्हे अभिलेखावरील सराईत व अटट्ल गुन्हेगार नजीर शेख याच्यावर २०१९ पासून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, मारामारी करणे, घातक हत्यारे जवळ बाळगणे, जबरी चोरी करणे, धमकी देणे, सामान्य नागरिकाना विनाकारण मारहाण करणे यासारखे एकूण ०५ गुन्हे दाखल आहेत. स्थानबदध इसमाचे वाढते गुन्हेगारी कारवाईना आळा घालणे साठी सन २०२३ साली त्यास ०२ वर्षा करिता तडीपार ही करण्यात आलेले होते. स्थानबध्द नजीर शेख याला तडीपार करूनही त्याने गुन्हे केलेले आहेत. नमुद सराईत गुंड व स्थानबध्द इसम नामे नजीर सलीम शेख (वय २९ वर्षे, रा. हनुमान मंदिरा जवळ काशेवाडी भवानी पेठ पुणे) याचेविरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुनही त्याचे वागणुकीत काहीएक फरक पडलेला नव्हता. तो अत्यंत क्रुर, खुनशी व भांडखोर असुन तो लोकांमध्ये काहीना काही कुरापती काढून मारहाण करुन गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत आहे.

व्यापा-यांना व बिल्डर ना खंडणी मागणे, सर्वसामान्य, शांतताप्रिय नागरीकांना विनाकारण त्रास देवुन आपला गुन्हेगारी हेतु साध्य करीत आहे. तसेच बेकायदेशीर घातक शस्त्र जवळ बाळगून लोंकामध्ये दहशत निर्माण केली होती. त्याचे दहशतीमुळे व भितीपोटी त्याचेविरुध्द तक्रार देण्यास कोणीही पुढे येत नव्हते. त्याचे अशा कृत्यामुळे सर्वसामान्य नागरीकांचे मनात भिती निर्माण होवून त्यांचे जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण झाला होता. खडक पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल माने यांनी त्यास स्थानबध्द करणे बाबत चा प्रस्ताव पोलिस आयुक्तांना सादर केला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन करून पोलिस आयुक्त यांनी ०९/११/२०२३ रोजी अमरावती मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे स्थानबध्द करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे खडक पोलिस स्टेशन कडून स्थानबध्द नजीर शेख यास अमरावती मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.

चालू वर्षामध्ये खडक पोलिस स्टेशन कडून तिस-या सराईत गुन्हेगारावर एम.पी.डी.ए कायदया अंतर्गत मोठी कारवाई केल्याने परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढला आहे. या अनुषंगाने पोलिसांकडुन समाजकंटक व अटट्ल गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले असून, त्यांचेविरुध्द कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

सदर कारवाई पोलिस आयुक्त रितेशकुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, प्रविण पाटील, अपर पोलिस आयुक्त, पश्चिम विभाग, पुणे शहर, संदिप गिल्ल, पोलिस उप आयुक्त, परि-१ पुणे, अशोक धुमाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शना खाली सुनिल माने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खडक पोलिस स्टेशन, पुणे, संपतराव राऊत, पोलिस निरीक्षक (गुन्हे), खडक पोलिस स्टेशन, पुणे. सहा पोलिस निरीक्षक राकेश जाधव, पोलिस उप निरीक्षक अतुल बनकर, पोलिस नाईक, नितिन जाधव, पोलिस अंमलदार महेश पवार, स्वप्नील बांदल यांनी सदर कारवाई मध्ये भाग घेवून प्रस्ताव तयार केलेला आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८०वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे एमपीडीए कारवाईचे अर्ध शतक…

पुणे शहरात युवकाला नग्न करुन लावलं नाचायला अन् पुढे…

पुणे शहरात थरार! सराफा व्यावसायिकावर गोळीबार अन् दागिने लुटले…

पुणे हादरलं! क्षुल्लक कारणावरुन टोळक्याने केली युवकाची हत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!