पुणे शहरात कोयता गँगने काढले पुन्हा डोके वर; पोलिसांनी काढली धिंड…
पुणे: पुणे शहरात कोयता गँगने पुन्हा डोके वर काढले असून, सलग दोन दिवस गाड्यांची तोडफोड करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोमवारी (ता. 19) भल्या पहाटे वारजे परिसरात पाच वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. मंगळवारी (20जून) तळजाई परिसरात पहाटे 30 गाड्या फोडण्यात आल्या आहेत. ही घटना वनशिव झोपडपट्टी परिसरात घडली असून, सहकार नगर पोलिसांकडून या प्रकरणात […]
अधिक वाचा...धक्कादायक! पुणे जिल्ह्यातील शाळेच्या बाथरूमध्ये मुलीवर बलात्कार…
पुणे: पुणे जिल्ह्यातील एका शाळेत 12 वर्षांच्या मुलाने शाळेच्या बाथरूममध्ये 7 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, ही घटना दोन दिवसांपूर्वी शाळेच्या आवारातील बाथरूममध्ये घडली होती. […]
अधिक वाचा...सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…
गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात लोणावळा विभागात सत्यसाई कार्तिक यांची सहायक पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती होताच क्षणार्थात लोणावळा विभागाची कामगिरी उजळली आहे. अल्पावधीत काळात कार्तिक यांनी गुन्हेगारी जगताची पाळेमुळे नष्ट करायला सुरुवात केली आहे. गुन्हेगार व बेकायदेशीर धंदे करणारे लोक अक्षरश: त्यांचे नाव घेताच थरकापाने उडत आहेत. अल्प परिचय… क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी […]
अधिक वाचा...आयपीएस अतुल कुलकर्णी: जमिनीवर राहून काम करणारा अधिकारी…
धाराशिव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अतुल विलास कुलकर्णी यांची नुकतीच भेट झाली. यावेळी त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा झाली. एक आयपीएस अधिकारी पण जमिनीवर राहून सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठ्या प्रमाण काम करत असल्याचे पाहायला मिळाले. पोलिस अधीक्षकपदाची जबाबदारी घेतल्यापासून त्यांच्या कामाचा वेग अतुलनीय आहे. कामापेक्षा कृतीवर भर दिल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील नागरिकही त्यांच्या प्रेमात पडल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्याविषयी […]
अधिक वाचा...अनिकेत पोटे : ‘फिटनेस’बाबत दक्ष अधिकारी!
पुणे (संतोष धायबर): ईश्वरी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि www.policekaka.comने तयार केलेल्या पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या आहेत. खडतर परिस्थितीतून अनेकजण यशस्वी झाले आहेत. मुलाखत घेत असताना अनेकांना अश्रू अनावर होत होते. पोलिस दलात येत असलेल्या अथवा MPSC, UPSC चा अभ्यास करणाऱयासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी आहे. पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखतींबरोबरच […]
अधिक वाचा...इतिहास पोलीस दल निर्मितीचा : अशोक इंदलकर
‘पोलीस’ हा शब्द उच्चारताच आपल्या नजरेसमोर उभा राहतो एका विशिष्ट वर्दीतील सरकारी अंमलदार! काही खास अधिकार असलेला, कायद्याची अंमलबजावणी करणारा, अरेरावी करणारा, उद्धट वाटणारा व समाजामधील लोकांची फारशी सहानुभूती नसलेला हा सरकारी अंमलदार ‘पोलीस’ म्हणून ओळखला जातो. सर्वसाधारणपणे जगभर पोलीस या शब्दाची खास ओळख (स्पेशल आयडेंटीटी) आहे. महसूल खाते, टेलिफोन खाते, विक्रीकर खाते किंवा इतर […]
अधिक वाचा...असा आहे पोलिस दलाचा इतिहास…
भारतातील पोलिस यंत्रणा प्राचीन राजाने जनतेचे संरक्षण करावे ही संकल्पना भारतात अगदी पुराण काळापासून आहे. ऋग्वेद, बृहदारण्यकोपनिषद या प्राचीन ग्रंथांपासून ते अगदी रामायणापर्यंत पोलिसांचे उल्लेख आढळतात. रामायणात ‘चारां’करवी प्रजेवर देखरेख ठेवण्याचा उल्लेख आहे. घडलेल्या गुन्ह्यांसाठी नगररक्षकांना जबाबदार धरण्यात येत असे. नगराबाहेर जाणाऱ्या बैलगाड्या नगररक्षक तपासत असत. ते रात्रंदिवस नगरात, नगराभोवती गस्त घालत असत. संशय आल्यास […]
अधिक वाचा...माता न तू वैरिणी! अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा म्हणून चिमुकल्याचा खून…
सांगली: अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या सहा वर्षाच्या चिमुकल्याचा महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माता न तू वैरिणी या म्हणीचा प्रत्येय आला असून, परिसरात खळबळ उडाली आहे. विटा पोलिसांनी ज्योती प्रकाश लोंढे (वय 28, रा. लेंगरे) आणि तिचा प्रियकर रुपेश नामदेव घाडगे (वय 25, रा. जोंधळखिंडी, ता. खानापूर) या दोघांना अटक […]
अधिक वाचा...व्हॉट्सऍपवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी…
धाराशिव: व्हॉट्सऍपवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून कानेगाव (ता. लोहारा) येथे बुधवारी (ता. १४) सकाळी दोन राजकीय गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. परस्परविरोधी तक्रार देण्यासाठी दोन्ही गट लोहारा पोलिस ठाण्यात आले होते. पण, पोलिस निरीक्षक अजित चिंतले यांनी दोन्ही गटांची समजूत काढून आपसातील वाद मिटविला. कानेगाव येथे शिवसेना, काँग्रेस हे दोन राजकीय गट प्रबळ आहेत. […]
अधिक वाचा...पुणे शहरातील प्रसिद्ध हॉटेल वैशाली बळकावण्याचा प्रयत्न; शिवाय…
पुणे : पुणे शहरातील फर्ग्युसन रस्त्यावरील प्रसिद्ध वैशाली हॉटेल बळकावण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप हॉटेल मालकाच्या मुलीने तिच्या पतीवर केला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. बंदुकीचा धाक दाखवून त्याची पॉवर ऑफ […]
अधिक वाचा...
