घराचा दरवाजा उघडताच मुलाची अवस्था पाहून आईने फोडला हंबरडा…

जळगाव: जळगाव शहरातील कांचन नगर भागात राहात असलेल्या पवन सुरेश राजपूत (वय २०) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पवनच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पवन हा गेल्या काही वर्षांपासून महापालिकेतील घंटागाडीवर कंत्राटी पध्दतीने कामाला होता. बुधवारी पवनने रजा घेतल्याने, तो कामावर गेलेला नव्हता. सकाळी जेवण केल्यानंतर आपल्या मित्रांसोबत काही वेळ घालविल्यानंतर सायंकाळी ५ वाजता घरी परतला. आई-वडिल कामावर गेल्यामुळे पवन हा घरी एकटाच होता. सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पवनने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, सायंकाळी ६ वाजता पवनची आई गीताबाई या घरी परतल्यानंतर दरवाजा उघडताच गळफास घेतलेला पवनचा मृतदेह दिसला. पवनचा मृतदेह पाहताच आईने जोरदार हंबरडा फोडला. पवनच्या आईचा आवाज ऐकल्यानंर शेजारील रहिवाशी पवनच्या घरात पोहचले. शेजाऱ्यांनी झालेल्या घटनेची शनिपेठ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

पवनच्या मागे मोठी बहिण असून, बहिणेचे लग्न झाले आहे. आई गीताबाई या हातमजूरी करतात, तर वडील सुरेश राजपूत हे बाजार समितीत बारदानचे काम करतात. एकुलता एक मुलाचा मृत्यूने आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. पवनने घेतलेल्या टोकाचा निर्णयामुळे मित्रांनाही मोठा धक्का बसला आहे. पवनच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या महिलेचा केला विनयभंग…

पिता-पुत्राच्या संशयास्पद मृत्यूनंतर धक्कादायक माहिती आली पुढे…

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला खून अन् मृतदेह लपवला…

डॉ. आदिनाथ पाटीलने स्वतःला इंजेक्शन घेऊन घेतला जगाचा निरोप…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!