लोणीकंद पोलिसांनी ऍपल कंपनीचे मोबाईल फोन चोरीचा गुन्हा केला उघड…

पुणे (संदीप कद्रे): लोणीकंद पोलिसांनी दोन कोटी रुपयांचे ऍपल कंपनीचे मोबाईल फोन चोरीचा गुन्हा उघड केला आहे. लोणीकंद पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.

लोणीकंद केसनंद रोडवर असणा-या एका गोडावून मधून एकुण अॅपल कंपनिचे २६६ मोबाईल फोन १७/७/२०२३ रोजी रात्री छतावरून प्रवेश करून चोरून नेण्यात आले होते. सदर घरफोडीच्या अनुशंगाने लोणीकंद पोलिस स्टेशनला गु.र.नं. ५८०/२०२३ भादवि कलम ४५४,४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे तपासात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली १७/७/२०२३ पासूनच लोणीकंद पोलिस स्टेशनने वेगवेगळ्या प्रकारे तपास सुरु केला होता. सपोनि रविंद्र गोडसे व
सपोनि गजानन जाधव यांच्या नेतृत्वात वेगवेगळ्या ठिकाणी पथके पाठविण्यात आली होती. रेकॉर्ड वरील गुन्हेगारांचा या अनुशंगाने शोध घेवून त्यांचे कडे ही तपास करण्यात आला होता. परंतु, सर्व प्रकारे तपास करुनही सदरचा गुन्हा उघडकिस येण्यासाठी गुन्हयाची पद्धत आणि यापुर्वीच्या अशा प्रकारचे गुन्हे केलेल्या गुन्हेगारांच्या टोळक्याचा अभ्यास करताना अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये झारखंड मधील साहेबगंज जिल्ह्यातील काही टोळया सक्रीय असल्याची माहिती मिळाली होती.

माहितीचे विश्लेषण करून त्या अनुशंगाने साहेबगंज जिल्ह्यातून माहिती मिळवून लोणीकंद पोस्टेचे सपोनि गजानन जाधव आणि पथक यांना राधानगर पोलिस स्टेशन साहेबगंज झारखंड च्या हद्दीत पाठविण्यात आले होते. त्यांनी सदर ठिकाणी तपास करून आरोपींचा शोध घेतला आणि आरोपी निष्पन्न केले परंतु सदरचे आरोपी हे पश्चिम बंगलमध्ये परागंदा झालेले असल्यामुळे आरोपी हाती मिळाले नाहीत. १९/०८/२०२३ रोजी लोणीकंद पोस्टेचे पोलिस नाईक अजित फरांदे आणि अमोल ढोणे यांना पुन्हा तपासकामी साहेबगंज येथे पाठविले असता त्यांना यातील पाहिजे आरोपी सलीम उर्फ असराउल इस्माईल फजल शेख (वय ३५ वर्षे, धंदा – मजुरी, रा. मध्य पियारपुर, तहसिल उधवा, ठाणा राधानगर, जिल्हा साहेबगंज, राज्य झारखंड) यास सदर गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आली. त्याचा ५ दिवसाचा ट्राझिस्ट रिमांड घेवून २४/०८/२०२३ रोजी लोणीकंद पोलिस स्टेशनला आणले आहे.

सदर आरोपीकडे विचारपुस केल्यानंतर त्याने इतर चार सहकाऱ्यांचे मदतिने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. सदरचा गुन्हा त्यांनी कशाप्रकारे केला याची माहिती पोलिसांना दिली. सदर गुन्हयातील चोरीला गेलेला मुद्देमाल हा टोळीचा म्होरक्या याने पश्चिम बंगाल मधील एका एजंटच्या मार्फतीने विकला असल्याची माहीती ही सदर आरोपीने दिली आहे. उर्वरीत आरोपींचा व चोरीचा माल घेणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. लवकरच त्यांचा ठावठिकाणा माहीत करुन त्यांना अटक केली जाईल, असे वपोनि विश्वजित काइंगडे यांनी सांगितले.

सदर गुन्हयामध्ये अपर पालीस आयक्त रंजन कुमार शर्मा, पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहा. पोलिस आयुक्त संजय पाटील, लोणीकंद पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सपोनि रविंद्र गोडसे, सपोनि गजानन जाधव, पोलिस अंमलदार स्वप्निल जाधव, कैलास साळुंके, अजित फरांदे, अमोल ढोणे, साईनाथ रोकडे यांनी तपासाकामी परिश्रम घेतले असुन गुन्हयाचा पुढील तपास सपोनि जाधव हे करत आहेत.

I-Phone, I-Pad, Smart Watch चोरणाऱ्यांना युनिट -2 ने केले जेरबंद…

लोणीकंद पोलिसांनी ‘व्यसनमुक्ती व महिला सुरक्षे’साठी केले ७६ किमी दौड…

लोणीकंद पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघड करून मुद्देमाल केला हस्तगत…

Video: एएम इन्फोवेब फाउंडेशनच्या वतीने पुणे पोलिस कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप…

Video: पुणे शहरातील कोयता गॅंगच्या दहशतीचा व्हिडीओ व्हायरल…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!