करुणा शर्मा यांच्या मोटारीवर मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला अन्…
बीड : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केल्यानंतर चर्चेत आलेल्या करुणा शर्मा यांच्या गाडीवर बीडमध्ये अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये हल्ला करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
करुणा शर्मा या बीड शहरात स्थायिक झाल्या असून, त्यांनी नवीन घर घेतले आहे. करुणा शर्मा यांनी घरासमोर लावलेल्या त्यांच्या गाडीवर तअज्ञात हल्लेखोराने मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास हल्ला केला आहे. यामध्ये गाडीच्या काचा फुटल्या असून, हल्लेखोरांनी गाडीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सर्व प्रकार लक्षात आल्यावर करुणा शर्मा यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आता आरोपींचा शोध सुरु केला आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळ्या आरोपांनंतर करुणा शर्मा चर्चेत आल्या होत्या. गेल्यावर्षी त्यांनी बीड शहरात घर घेऊन, बीडमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. तर, धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढण्यासाठी मी कंबर कसली असून, आता बीडमध्ये घर घेतले असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. बीडचे लोकं माझ्यासोबत असल्याचं करुणा शर्मा म्हणाल्या होत्या. तेव्हापासून त्या बीडमध्येच राहत आहे. मात्र, त्यांच्या गाडीवर हल्ला झाल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहेत. तसेच हा हल्ला कोणी केला याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.
बीड पोलिसांकडून शांततेचे आवाहन; अफवा पसरवू नका…
मित्राने धमकी देत लहानपणीच्या मैत्रीणीवर केला बलात्कार…
घराचा दरवाजा उघडताच मुलाची अवस्था पाहून आईने फोडला हंबरडा…
इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत उत्तर; संदीप पाणीपुरी खात असतानाच झाला गतप्राण…
भाजी विक्रेत्या युवकावर हल्लेखोरांनी दिवसा सपासप केले वार…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…