नवविवाहितेच्या अपहरण प्रकरणाला लागले वेगळे वळण…
चंदीगड (हरियाणा): एक नवविवाहित महिला विवाहानंतर पती सोबत देव दर्शनाला गेली होती. दर्शनावरून परतत असताना तिच्या पतीला मारहाण करून तिचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार दाखल झाली होती. पण, अपहरण नव्हे तर प्रियकराने तिच्या इच्छेनुसार पळून नेल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे.
हिसार येथील चरणजीत आणि सलोनी या दोघांचा मोठ्या उत्साहात विवाह सोहळा पार पडला होता. विवाहानंतर दोघे दर्शनासाठी मंदिरात गेले होते. दर्शन झाल्यानंतर दोघे बाहरे पडले होते. रस्त्यावर आले असताना एक मोटार जवळ येऊन थांबली. दोघेही मोटारीत बसून निघाले होते.
मोटार पुढे गेल्यानंतर काही वेळातच चरणजीतला मोटारीमध्येच मारहाण करण्यात आली आणि मोटारीमधूनच खाली ढकलून निघून गेले होते. यानंतर चरणजीत याने पत्नीचे अपहरण आणि मारहाणीची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर सलोनी हिनेच हे सर्व घडून आणल्याचे उघड झाले.
सलोनी हिचे लग्नाच्या अगोदरपासून एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. सलोनी मंदिरात गेल्यापासून प्रियकराला लोकेशन पाठवत होती. दोघांनी ठरवून हे केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक केली आहे. शिवाय, दोन्ही कुटुंबियांना बोलवून याबाबतची माहिती दिली. दोन्ही कुटुंबियांच्या निर्णयानंतर पोलिस पुढील कारवाई करणार आहेत.
नवविवाहीत दाम्पत्याची आत्महत्या; सुसाईड नोट मध्ये लिहीले…
हनीमूनला जाताना बेपत्ता झालेली नवरी अखेर सापडली…
प्रेमविवाह ठरला अन् लग्नाच्या दिवशी नवरदेवाने ठोकली मेहुणीसोबत धूम…
प्रेमसंबंधातूनच अंजलीची हत्या; प्रियकराने तपासादरम्यान सांगितले…
धक्कादायक! प्रेम प्रकरणातून युवकाला जखमी अवस्थेतच फेकले विहिरीत अन्…