लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने युवकाने उचलले धक्कादायक पाऊल…
हैदराबाद : लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने मुलाने आपल्या आईचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना तेलंगणातील सिद्धीपेट जिल्ह्यातील बांदा मेलाराम या गावात बुधवार मध्यरात्री घडली. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ईश्वर (वय २१) असे आरोपी मुलाचे नाव असून त्याने आई व्यंकटम्मा (वय ४५) हिची निर्घृण हत्या केली. या हत्येप्रकरणी महिलेचा मुलगा आणि अन्य एका नातेवाईकाला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या मुलीच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान पीडितेचा मुलगा आणि अन्य एका नातेवाईकाने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने महिलेला आधी विटांनी मारहाण केली आणि नंतर तिचा गळा चिरून तिचे पाय कापले. चोरीच्या उद्देशाने हा खून झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न मुलाने केला होता.
दिव्यांग ईश्वर त्याच्या आईवर लग्नासाठी मुलगी शोधण्यासाठी दबाव आणत होता. दिव्यांग आणि बेरोजगार असल्याने मुलगी मिळत नव्हती. याचाच राग आल्याने त्याने साथीदारासह मिळून आईची हत्या केली. आरोपीने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
नवऱ्याचे दुसरं लग्न सुरू असतानाच पत्नी मुलाला घेऊन पोहोचली लग्न मंडपात अन्…
प्रेमविवाह ठरला अन् लग्नाच्या दिवशी नवरदेवाने ठोकली मेहुणीसोबत धूम…
लॉजवर मैत्रिणीसोबत असताना शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनाने युवकाचा मृत्यू…
प्रेम विवाह! मित्राने फोन करून दिली पत्नीबाबतची धक्कादायक माहिती अन्…
दिराचे वहिनीसोबत अनैतिक संबंध अन् वहिनीचे आणखी…