मित्राने धमकी देत लहानपणीच्या मैत्रीणीवर केला बलात्कार…
पुणे: लहानपणापासून मित्र असलेल्या एकाने दोघांचे एकत्र असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मैत्रीणीवर (वय २६) बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पीडित युवतीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
चंदननगर परिसरात राहणाऱ्या युवतीने दिलेल्या तक्रारीनंतर चंदननगर पोलिसांनी आसिफ रहीम शेख (वय 26 रा. मुपो. पाडळी, ता. शिरुर, जि. बीड) याच्यावर आयपीसी 376, 504, 506, 354 (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जुलै 2022 ते 13 डिसेंबर 2022 या कालावधीत वाघोली येथील हॉटेल मध्ये व आरोपीच्या चंदननगर येथील भावाच्या घरी घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती आणि फिर्यादी हे बालपणाचे मित्र आहेत. त्या दोघांनी एकमेकांसोबत काढलेले साधे फोटो व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी आरोपीने युवतीला दिली. तसेच तुझ्या मामाला ठार मारेल अशी धमकी देऊन तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत पीडित तरुणीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक मुळुक या करीत आहेत.
पुणे जिल्हा हादरला! पित्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार…
धक्कादायक! पुणे जिल्ह्यातील शाळेच्या बाथरूमध्ये मुलीवर बलात्कार…
नात्याला काळीमा! अल्पवयीन पुतणीवर बलात्कार; सात महिन्यांची गर्भवती…
पुणे शहरातील महिलेच्या पतीचे कोरोनात निधन, अल्पवयीन युवकासोबत शरीरसंबंध अन्…
नवऱ्याच्या दोन मित्रांनी महिलेच्या इच्छेविरुद्ध ठेवले अनैसर्गिक शरीरसंबंध…
धक्कादायक! सावकाराने पतीसमोरच पत्नीवर केला बलात्कार…