Video: लघनऊ-रामेश्वर रेल्वेला भीषण आग; नऊ प्रवाशांचा मृत्यू तर…

चेन्नई (तामिळनाडू): मदुराईमध्ये लघनऊ-रामेश्वर या रेल्वे गाडीला भीषण आग लागल्याची घटना घडली असून, यामध्ये नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. शिवाय, 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (शनिवार) सकाळी मदुराई यार्ड जंक्शनवर गाडी थांबवली तेव्हा आग लागली आहे. त्यानंतर काही प्रवाशांनी बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडर घेऊन रेल्वे डब्यात प्रवेश केला होत. या सिलेंडरमुळेच ट्रेनला भीषण आग लागली आहे. ट्रेनला लागलेल्या आगीचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये डब्यात भीषण आग दिसत आहे. त्याचवेळी आजूबाजूला काही लोक ओरडत आहेत. आग लागल्यानंतर मोठा आवाज येत आहे. यानंतर अग्निशामनक दलाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुनालूर-मदुराई एक्स्प्रेसच्या एका खासगी डब्यात आज पहाटे 5.15 वाजता मदुराई यार्डमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी धाकल झाले होते. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली आहे.

दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. तामिळनाडूच्या मदुराईमध्ये लघनऊ-रामेश्वर या रेल्वे गाडीला भीषण आग लागल्यामुळं नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या आगीत 25 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पुढील तपास सुरू आहे.

रेल्वेचा पूल कोसळून १७ कामगारांचा मृत्यू…

RPF आरोपीचा अजब दावा; रेल्वेमधील हत्याकांडाचा घटनाक्रम…

Video: पत्नीला धक्का लागला म्हणून मारहाण; युवक रुळावर पडला अन् क्षणात…

Video: जवानाने प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी लावली जीवाची बाजी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!