लग्नसमारंभावेळी हॉलमध्ये अग्नितांडव, 100 जणांचा मृत्यू…
बगदाद (इराक): उत्तर पूर्व क्षेत्रात लग्नसमारंभावेळी मंडपात आग लागून किमान १०० जणांचा मृत्यू तर १५० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये वधू-वराचाही समावेश आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याबाबत आलेल्या प्राथमिक अहवालानुसार लग्नसमारंभावेळी आतषबाजी करत असतानाच आगीचा भडका उडाला. राजधानी बगदादपासून ४०० किमी अंतरावर असलेल्या मोसूल शहरापासून जवळच […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिस स्टेशन येथे सर्वधर्म समभाव आरतीचे आयोजन!
पुणे (संदीप कद्रे): कोंढवा पोलिस स्टेशन येथे पोलिस स्टेशन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व धर्म समभाव गणपती आरतीचे सोमवारी (ता. २५) अयोजन करण्यात आले होते. कोंढवा पोलिस स्टेशन येथे गणपती विसर्जनानिमीत्त सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी कोंढवा पोलिस स्टेशन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ( सर्व धर्म […]
अधिक वाचा...पुणे शहरात गणपती विसर्जनावेळी वाहतुकीत मोठे बदल; पाहा कोणते रस्ते बंद…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात गुरुवारी (ता. २८) अनंत चथुदर्शीला गणपती विसर्जनावेळी वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे शहरचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आज (मंगळवार) दिली. पुणे शहरात गणपती विसर्जनासाठी 9 हजार पोलिसांचा बंदोबस्त असेल, तसेच 3,865 गणेश मंडळांचे विसर्जनाचे नियोजन असणार आहे. मध्यवर्ती भागातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. […]
अधिक वाचा...मिलिंद एकबोटे यांच्यासह 3 जणांवर गुन्हा दाखल…
पुणे : पुणे महापालिकेसमोर बेकायदेशीर आंदोलन केल्यामुळे समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह 3 जणांवर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्येश्वर पुनर्वसन समितीचे अध्यक्ष कुणाल कांबळे, मिलिंद एकबोटे, किरण शिंदे, विशाल पवार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बेकायदेशीर आंदोलन आणि प्रक्षोभक भाषणं केल्यामुळे मुस्लीम संघटना आक्रमक झाल्या होत्या. […]
अधिक वाचा...Video: पाकिस्तानी सीमा हैदरला ‘बिग बॉस 17’ ची ऑफर
मुंबई : पाकिस्तानमधून चार मुलांसह भारतीय प्रियकर सचिन मीना याच्यासाठी पळून भारतात दाखल झालेली सीमा हैदर सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. रिॲलिटी शो ‘बिग बॉस’मधून तसेच कॉमेडी कार्यक्रमांसाठीही ऑफर आल्याचा दावा सीमा हैदर हिने केला आहे. सीमाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. सीमा हैदर हिने दावा केला आहे की, छोट्या पडद्यावरील शोमधून […]
अधिक वाचा...Video: ऑफिसमधील दृश्य कैद पाहून घाबरण्याची शक्यता…
नवी दिल्ली : ऑफिसमध्ये रात्रीच्या वेळी स्मशानशांतता असताना विविध गोष्टी घडताना दिसत आहेत. संबंधित घटना जुनी असली तरी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. संबंधित दृश्य कैद पाहून घाबरण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. यामुळे तुम्ही व्हिडीओ पाहताना सांभाळूनच पाहा. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एका ऑफिसमध्ये रात्रीच्या वेळी कोणीही नाही. पण, कॉम्प्युटर अचानक […]
अधिक वाचा...चिमुकली वर्गातच अडकली अन् रडून रडून थकली…
छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या एका शाळेतील पहिल्या इयत्तेतील विद्यार्थिनी वर्गात असताना वॉचमन खोलीला कुलूप लावून निघून गेला होता. चिमुकली वर्गातच अडकली होती. रडून-रडून थकली होती. अखेर, सात तासांनी नागरिकांनी तिची सुटका केली. छत्रपती संभाजीनगर शहरातील रोजाबाग येथील महानगरपालिका शाळेतील हा प्रकार असून, उम्मेखैर मुजम्मिल असे मुलीचं नाव आहे. या घटनेनंतर पालकांमध्ये संतपाचे वातावरण आहे. महानगरपालिकेच्या […]
अधिक वाचा...Video: कपिल देव यांचे तोंड आणि हात बांधून घेऊन जात आहेत…
नवी दिल्ली: टीम इंडियाचे माजी कर्णधार दिग्गज कपिल देव यांचे अपहरण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण, कपिल देव यांचा व्हायरल झालेला व्हीडिओ हा खरा नसल्याचा दावा केला जात असून, कपिल देव यांचा व्हीडिओ हा एका जाहीरातीचा भाग असल्याची माहिती पुढे आली आहे. कपिल देव यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या व्हीडिओत […]
अधिक वाचा...प्रवाशांनी भरलेली बस मध्यरात्री पुलावरुन कोसळली…
जालना : संभाजीनगर-जालना रोडवर बसला सोमवारी (ता. २५) मध्यरात्री भीषण अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली बस मध्यरात्री पुलावरुन कोसळल्याने बसमधील 25 प्रवासी जखमी झाले आहेत. संभाजीनगर ते जालना रोडवर मध्यरात्री ही घटना घडली. एक खाजगी बस पुलावरुन खाली कोसळल्यामुळे 25 प्रवासी जखमी झाले आहेत. तर, चार जण गंभीर आहेत. पूजा ट्रव्हल्सची ही बस होती. ही बस […]
अधिक वाचा...टेम्पोच्या धडकेत जखमी झालेल्या पोलिसकाकाचा अखेर मृत्यू…
बारामती: बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलिसकाकाचा आज (सोमवार) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संदीप जगन्नाथ कदम असे निधन झालेल्या हवालदाराचे नाव आहे. त्यांच्या निधनामुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. संदीप कदम हे पुणे ग्रामीण पोलिस दलाअंतर्गत पाटस पोलिस चौकीत कार्यरत होते. शुक्रवारी (ता. २२) सायंकाळच्या सुमारास व्यायामासाठी जात असताना […]
अधिक वाचा...
