कोंढवा पोलिस स्टेशन येथे सर्वधर्म समभाव आरतीचे आयोजन!

पुणे (संदीप कद्रे): कोंढवा पोलिस स्टेशन येथे पोलिस स्टेशन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व धर्म समभाव गणपती आरतीचे सोमवारी (ता. २५) अयोजन करण्यात आले होते.

कोंढवा पोलिस स्टेशन येथे गणपती विसर्जनानिमीत्त सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी कोंढवा पोलिस स्टेशन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ( सर्व धर्म समभाव गणपती आरती) चे अयोजन करण्यात आला. कोंढवा पोलिस स्टेशन येथे मुस्लीम बांधवांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करण्यात आली. धार्मीक सलोखा टिकविण्यासाठी अखंडपणे प्रयत्न करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते गणपती बाप्पाची सर्व धर्म समभाव आरती करण्यात आली.

यावेळी अप्पर पोलिस आयुकत पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त परिमंडळ ५ विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलिस आयुक्त शाहुराजे साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस स्टेशन संतोष सोनवणे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले होते. यावेळी संदिप भोसले पोलिस निरीक्षक गुन्हे १, संजय मोगले पोलिस निरीक्षक २, व पोलिस स्टेशन कडील स्टाफ तसेच शांतता कमिटी मोहल्ला कमिटी, विघ्नहर्ता न्यास कमीठ, एस. पी. ओ तसेच अन्य नागरिक हजर होते. सदर कार्यक्रमानंतर गणपती बाप्पाची विधीपूर्वक कोंढवा पोलिस स्टेशन ते प्रतिभा ताई शाळेजवळील विर्सजन हौद अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.

पुणे शहरात गणपती विसर्जनावेळी वाहतुकीत मोठे बदल; पाहा कोणते रस्ते बंद…

एम. एम. गँगचा म्होरक्याला कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

पुणे शहरात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे, दोघांना अटक…

पुणे दहशतवादी प्रकरण : भूलतज्ञ डॉक्टर युवकांना ओढायचा ISISच्या जाळ्यात अन्…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!