गणपती विसर्जनादरम्यान चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू…
पुणे : पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे गणपती विसर्जनादरम्यान चार वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अर्णव आशिष पाटील या चार वर्षीय मुलाचे नाव आहे. मोशी येथील मंत्रा सोसायटी या ठिकाणी गुरुवारी (ता. २८) सायंकाळी ही घटना घडली आहे. अर्णव हा सोसायटीमधील गणपती विसर्जन टाकीच्या शेजारी […]
अधिक वाचा...पुणे शहरात गणेशोत्सवादरम्यान पोलिसकाकांना भोजन व अल्पोपहार!
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात गणेशोत्सवादरम्यान बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना भोजन व अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यावेळी अनेकांनी कर्तेव्य बजावताना भोजनाचा आस्वाद घेतला, अशी माहिती दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी दिली. प्रशांत शिंदे म्हणाले, ‘गणेशोत्सव विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी साधारणपणे सलग ४८ तास पोलिस अंमलदार व अधिकारी यांना […]
अधिक वाचा...दोन युवकांच्या मृत्यूला डीजेचा दणदणाट ठरला कारणीभूत…
सांगली : सांगली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन युवकांच्या मृत्यूला डीजेचा दणदणाटही कारणीभूत ठरला आहे. तासगाव तालुक्यातील कवठेएकंदमधील शेखर पावशे (वय 32, रा. कवठेएकंद, ता. तासगाव) आणि प्रवीण शिरतोडे (वय 35 रा. दुधारी, ता. वाळवा) अशी मृत युवकांची नावे आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी हे दोघे गेले होते. मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटाने अस्वस्थ वाटू […]
अधिक वाचा...मुंबईमधील अनंत चतुर्दशीला कोणते रस्ते राहणार बंद; पाहा यादी…
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील विसर्जनाच्या दिवशी (ता. 28) महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले असून, विसर्जनानिमित्त मुंबईतील पोलिस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबई पोलिसांच्या वैद्यकीय रजा वगळता इतर सर्व रजा रद्द करण्यात आल्या आहे. चौपाट्या, तलाव याा ठिकाणी पालिकेने विसर्जनाची चोख तयारी ठेवली आहे. मुंबई शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक गुरुवारी […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिस स्टेशन येथे सर्वधर्म समभाव आरतीचे आयोजन!
पुणे (संदीप कद्रे): कोंढवा पोलिस स्टेशन येथे पोलिस स्टेशन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व धर्म समभाव गणपती आरतीचे सोमवारी (ता. २५) अयोजन करण्यात आले होते. कोंढवा पोलिस स्टेशन येथे गणपती विसर्जनानिमीत्त सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी कोंढवा पोलिस स्टेशन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ( सर्व धर्म […]
अधिक वाचा...पुणे शहरात गणपती विसर्जनावेळी वाहतुकीत मोठे बदल; पाहा कोणते रस्ते बंद…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात गुरुवारी (ता. २८) अनंत चथुदर्शीला गणपती विसर्जनावेळी वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे शहरचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आज (मंगळवार) दिली. पुणे शहरात गणपती विसर्जनासाठी 9 हजार पोलिसांचा बंदोबस्त असेल, तसेच 3,865 गणेश मंडळांचे विसर्जनाचे नियोजन असणार आहे. मध्यवर्ती भागातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. […]
अधिक वाचा...Video : गणपतीच्या मंडपात नाचताना युवकाचा मृत्यू झाला कॅमेरात कैद…
धर्मावरम (आंध्र प्रदेश): गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या मंडपात नाचताना युवकाचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली प्रसाद (वय 26) असे मृत तरुणाचे नाव आहे. संबंधित घटना 20 सप्टेंबर रोजी घडली. आंध्र प्रदेशातील धर्मावरम […]
अधिक वाचा...Video: लालबागच्या राजाच्या मंडपात फ्री स्टाईल हाणामारी…
मुंबईः मुंबईतील नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. पण, गर्दी अनियंत्रित झाल्याने मंडळाचे पदाधिकारी आणि भाविकांमध्ये प्रचंड हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या भाविकांना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. भाविक आणि कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा धक्कादायक […]
अधिक वाचा...दीड दिवसांच्या गणपती विसर्जन करताना तिघांचा बुडून मृत्यू…
पालघर: दीड दिवसांच्या गणपती विसर्जन करताना तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. जगत नारायण मौर्य (वय 38), सुरज नंदलाल प्रजापती (वय 25), प्रकाश नारायण ठाकरे (वय 35) अशी तलावात बुडून मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. बुधवारी सायंकाळी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यासाठी गेले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने कोनसई येथील […]
अधिक वाचा...Video: पाकिस्तानमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर!
कराची (पाकिस्तान): कराची शहरातील गणेश मठ मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा होत आहे. पाकिस्तानमधील मराठी बांधव गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. यंदाही विविध भागांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जात आहे. पाकिस्तानमध्ये कराचीत यंदाही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. कराचीत गणेश चतुर्थीला गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झाले. कराचीत राहणारे प्राण सुरेश नाईक यांच्या […]
अधिक वाचा...