लग्नसमारंभावेळी हॉलमध्ये अग्नितांडव, 100 जणांचा मृत्यू…

बगदाद (इराक): उत्तर पूर्व क्षेत्रात लग्नसमारंभावेळी मंडपात आग लागून किमान १०० जणांचा मृत्यू तर १५० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये वधू-वराचाही समावेश आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

याबाबत आलेल्या प्राथमिक अहवालानुसार लग्नसमारंभावेळी आतषबाजी करत असतानाच आगीचा भडका उडाला. राजधानी बगदादपासून ४०० किमी अंतरावर असलेल्या मोसूल शहरापासून जवळच हा हॉल होता. विवाहस्थळी आग वेगाने पसरली आणि रौद्ररुप धारण केले. यानंतर एकच गोंधळ उडाला. नागरिकांना बाहेर पडता येत नव्हते. अनेकजण पायाखाली तुडवले गेले तर धुरामुळे अनेकांचा जीव गुदमुरून मृत्यू झाला आहे.

अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली की, आगीच्या दुर्घटनेनंतर रुग्णवाहिका, डॉक्टर्स आणि बचावदलाचे पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. घटनास्थळी असलेल्यांनी सांगितले की, स्थानिक वेळेनुसार रात्री पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली. लग्नसमारंभासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक आले होते. अचानक घडलेल्या या घटनेने मोठा गोंधळही उडाला होता. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!