
लखोबा लोखंडे! विधवा महिलेशी लग्न अन् सोनं, चांदी पैसे घेऊन पळाला…
मुंबई : मॅरेज ब्युरोवरून ओळख झालेला व्यक्ती हा एक लखोबा लोखंडे निघाला असून, लग्न झाल्यानंतर त्याने महिलेची फसवणूक करत तिच्याकडील 17 लाखांचा मुद्देमाल घेऊन पसार झाला आहे. प्रदीप नाईक (रा. दिंडोशी) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
दिंडोशीतील एक 50 वर्षीय महिलेची 28 वर्षांची मुलगी आहे. त्या मुलीचे लग्न ठरल्यानंतर आपली विधवा आई घरी एकटीच राहणार असल्याची तिला काळजी वाटत होती. तिने अनेक मॅरेज ब्युरोंवर तिच्या आईचे नाव नोंदवले. प्रदीप नाईक याने तिच्या पत्नीचे आणि मुलीचे कोविड काळात निधन झाल्याची माहिती दिली. नंतर त्या विधवा महिलेचा विश्वास संपादन केला आणि त्यांनी लग्न केले. लग्न झाल्यानंतर प्रदीप नाईक याने त्या महिलेचे सोन्याचे आणि चांदीचे सर्व दागिने ताब्यात घेतले. त्याचसोबत दीड लाखांची रोख रक्कमही घेतली. त्या महिलेला कोड्रिंकमधून गुंगीचे औषध दिले आणि सर्व मुद्देमाल घेऊन पसार झाला.
महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या महिलेने तिच्या मुलीला बोलावून घेतले आणि सगळी हकिकत सांगितली. आरोपीने 29.5 तोळे सोने, 1.5 किलो चांदी व 1.50 लाख रोख रक्कम असा एकूण 17 लाख 15 हजारांचा ऐवज घेऊन पळ काढला आहे. प्रदीप नाईकने ज्या ठिकाणी कामाला असल्याचे सांगितले होते. त्या ठिकाणी नंतर चौकशी केली असता त्याने कोरोना काळातच काम सोडल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी दिंडोशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
लखोबा लोखंडे! पोलिस फौजदार असल्याचे सांगून केली पाच लग्न अन्…
लखोबा लोखंडे! दोघींशी लग्न, तिसरीसोबत बोलणी, चौथ्यांदा बोहल्यावर चढणार, तेवढ्यात…
राजाबाबू! डॉक्टर तर कधी अधिकारी सांगून 6 महिलांशी केली लग्न अन्…
युवतीने केली 13 दिवसांमध्ये 3 लग्न अन् हनिमूनच्या वेळी…
अहमदनगर जिल्ह्यात सिमरनने 8 महिन्यांत केली 9 लग्न; अखेर डाव फसला…
डॉक्टर नवरा अनेक महिलांशी चॅटिंग करायचा अन् एके रात्री…
नाशिकमध्ये लाल-निळ्या दिव्यांची गाडी अन् पोलिसांची वर्दी घालणारा तोतया IPS…
IPS महिला अधिकाऱ्याची फसवणूक; लग्नानंतर खरी माहिती उघड…

