प्रवाशांनी भरलेली बस मध्यरात्री पुलावरुन कोसळली…

जालना : संभाजीनगर-जालना रोडवर बसला सोमवारी (ता. २५) मध्यरात्री भीषण अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली बस मध्यरात्री पुलावरुन कोसळल्याने बसमधील 25 प्रवासी जखमी झाले आहेत.

संभाजीनगर ते जालना रोडवर मध्यरात्री ही घटना घडली. एक खाजगी बस पुलावरुन खाली कोसळल्यामुळे 25 प्रवासी जखमी झाले आहेत. तर, चार जण गंभीर आहेत. पूजा ट्रव्हल्सची ही बस होती. ही बस (एम एच 40 सी 6969) पुण्याहून नागपूरकडे जात होती. रात्री 12 वाजेच्या सुमारास संभाजीनगर ते जालना महामार्गावरील बदनापूरजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुलावरुन खाली कोसळली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

टेम्पोच्या धडकेत जखमी झालेल्या पोलिसकाकाचा अखेर मृत्यू…

आठ महिन्यांच्या गर्भवती पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू…

नगर-कल्याण मार्गावर भीषण अपघात! पाच मजुरांना चिरडले…

गर्भवती बहिणीला घेऊन घरी निघालेला भावंडांचा हृदयद्रावक शेवट…

पोलिसांच्या गाडीसह चार वाहनांना धडक; पोलिसकाका जखमी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!