Video: कपिल देव यांचे तोंड आणि हात बांधून घेऊन जात आहेत…

नवी दिल्ली: टीम इंडियाचे माजी कर्णधार दिग्गज कपिल देव यांचे अपहरण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण, कपिल देव यांचा व्हायरल झालेला व्हीडिओ हा खरा नसल्याचा दावा केला जात असून, कपिल देव यांचा व्हीडिओ हा एका जाहीरातीचा भाग असल्याची माहिती पुढे आली आहे.

कपिल देव यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या व्हीडिओत कपिल देव यांचे अपहरण केले जात आहे. टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यानेही हाच व्हिडिओ शेअर केला आहे. ‘हा व्हीडिओ आणखी कुणाकडे आला आहे का? कपिल देव सुखरुप आणि सुरक्षित असतील अशीच आशा आहे’, असे म्हणत गंभीरने कपिल देव यांचा व्हीडिओ काळजीपोटी शेअर केला आहे.

संबंधित व्हिडिओमध्ये कपिल देव यांचे तोंड आणि हात बांधलेले आहेत. त्यांना दोघे जण कुठेतरी घेऊन जाताना दिसत आहेत. त्या आसपास मोठ्या प्रमाणात झाडं दिसून येत आहेत. काहींनी शंका व्यक्त करत म्हटले की हे कपिल देव नाहीच. तर काही जण म्हणतायेत की खरंच कपिल देव याचं अपहरण झालंय का? संबंधित व्हायरल व्हिडिओमुळे अनेक जण संभ्रमात आहेत.

पण, कपिल देव यांचा व्हायरल झालेला व्हीडिओ हा खरा नसल्याचा दावा केला जात आहे. कपिल देव यांचा व्हिडिओ हा एका जाहीरातीचा भाग असल्याचे म्हटले जात आहे. अनेक कंपन्यांकडून चित्तवेधक आणि लक्षवेधक जाहिराती केल्या जातात. सर्वसामांन्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो. तोच प्रकार कपिल देव यांच्या व्हिडिओबाबतही असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी एका मुलाखतीदरम्यान त्यांचे अपहरण केल्याचे नाटक केले होते. त्यानंतर भोगले यांनी जाहीर माफीही मागितली होती. त्यामुळे कपिल देव यांचाही व्हीडिओ प्रँक किंवा जाहीरातीचा भाग असून ते सुखरुप असतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Video : गणपतीच्या मंडपात नाचताना युवकाचा मृत्यू झाला कॅमेरात कैद…

Video:सीमाने सचिनमध्ये असं काय पाहिलं?

Video: अल्पवयीन मुलाने गुपचुप वडिलांची कार केली सुरू अन्…

Video: व्यापाऱ्याला बेदम मारहाण अन् नग्न करून काढली धिंड…

Video: लालबागच्या राजाच्या मंडपात फ्री स्टाईल हाणामारी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!