पुणे शहरात गणपती विसर्जनावेळी वाहतुकीत मोठे बदल; पाहा कोणते रस्ते बंद…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात गुरुवारी (ता. २८) अनंत चथुदर्शीला गणपती विसर्जनावेळी वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे शहरचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आज (मंगळवार) दिली.

पुणे शहरात गणपती विसर्जनासाठी 9 हजार पोलिसांचा बंदोबस्त असेल, तसेच 3,865 गणेश मंडळांचे विसर्जनाचे नियोजन असणार आहे. मध्यवर्ती भागातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. नागरिकांच्या वाहतूक मार्गदर्शनासाठी ‘सारथी गणेशोत्सव गाईड 2023’ सुरू केले आहे. गणपती विसर्जनाच्या मुख्य मार्गावर सीसीटीव्ही कॅमेराद्वारे नजर ठेवली जाणार आहे, असेही पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले.

पुणे शहरातील विसर्जनाच्या दिवशी पुढील रस्ते असणार बंद…
शिवाजी रोड
लक्ष्मी रोड
बाजीराव रोड
कुमठेकर रोड
गणेश रोड
केळकर रोड
टिळक रोड
शास्त्री रोड
जंगली महाराज रोड
कर्वे रस्ता
फर्ग्युसन रोड
भांडारकर रस्ता
पुणे-सातारा रोड (व्होल्गा चौक ते जेधे चौक)
सोलापूर रोड
प्रभात रोड
बगाडे रोड
गुरुनानक रोड

Video: गणपती वर्गणीच्या नावाखाली किरणा दुकानदाराच्या लावली कानाखाली…

पुणे पोलिस आयुक्तांकडून एम.पी.डी.ए. कायद्यान्वये २६वी कारवाई…

पुणे पोलिस आयुक्तांची दोघांविरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई…

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; रात्रीत 159 गुन्हेगारांना अटक…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!