आयएएस अधिकाऱ्याच्या मुलाने प्रेयसीला चिरडले…

ठाणेः एका आयएएस अधिकाऱ्याच्या मुलाने प्रेयसीला कारखाली चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पीडिता गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली आहे.

घोडबंदर येथे राहणाऱ्या पीडित महिला या उच्चशिक्षित आहेत. या महिलेला सोमवारी मध्यरात्री साडेचार वाजेच्या सुमारास तिचा प्रियकर अश्र्वजित गायकवाड याने ओळवा येथील कोटियाड हॉटेल जवळ भेटायला बोलावले. महिला तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्यात काही वाद झाले. आरोपी अश्र्वजित गायकवाड याने आपल्या प्रेयसीला शिवीगाळ करून जबर मारहाण केली. तसेच तिच्या डाव्या हाताला देखील चावा घेतला. आरोपीचा मित्र असलेल्या रोमील पाटील आणि सागर शेळके यांनी देखील चारचाकी गाडी पीडितेच्या अंगावर घातली. या घटनेत पीडितेच्या पायाला जबर मारहाण झाली असून शरीरावर जखमा झाल्या आहेत. संबंधित घटनेप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडिताने सांगितले आहे की, गेल्या साडेचार वर्षांपासून माझे अश्वजीत गायकवाड सोबत प्रेम आहे. मात्र मला माहिती नव्हती की तो विवाहित आहे. मला त्या रात्री माहिती पडले की, तो विवाहित आहे. या अगोदर त्यांनी मला या गोष्टी सांगितल्या नव्हत्या. मी त्याला भेटण्यासाठी सांगितले. त्या ठिकाणी त्याची पत्नी सोबत होत्या. माझ्या बरोबर त्याने वाद घातला. माझ्यावर हल्ला केल्यानंतर माझ्या शरीरावर दुखापत झालेली आहे. पोलिसांनी त्यावेळेस कोणतीही कारवाई केली नव्हती. माझ्या इंस्टाग्राम पोस्टमुळे आता कुठे पोलिस जागी झाली आहेत, अशी माहिती पीडित महिलेने दिली आहे.

कासारवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पीडित महिलेने पुन्हा जबाब नोंदवण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने देखील पोलिस पुन्हा जवाब नोंदवून घेणार आहेत. तसेच या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच त्या ठिकाणी असणारे साक्षीदार यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. संबंधित प्रकरणातील तीनही आरोपी फरार आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास कसारवडवली पोलिस करत आहेत, अशी प्रतिक्रिया ठाण्याचे पोलिस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली.

प्रेमप्रकरण! बिझनेस मिटींगसांगून प्रेयसीसोबत राहू लागला अन् पुढे…

प्रेमविवाह! डॉक्टरने पत्नीसह 2 मुलांना हातोड्यानं ठेचून मारलं अन् पुढे…

धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून युवतीच्या गुप्तांगावर झाडल्या गोळ्या…

अभिनेत्रीचा आढळला मृतदेह; प्रेमसंबंधातून आत्महत्या…

व्याही आणि विहीणमध्ये जुळले प्रेमसंबंध; पळूनही गेले पण…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!