चिमुकली वर्गातच अडकली अन् रडून रडून थकली…
छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या एका शाळेतील पहिल्या इयत्तेतील विद्यार्थिनी वर्गात असताना वॉचमन खोलीला कुलूप लावून निघून गेला होता. चिमुकली वर्गातच अडकली होती. रडून-रडून थकली होती. अखेर, सात तासांनी नागरिकांनी तिची सुटका केली.
छत्रपती संभाजीनगर शहरातील रोजाबाग येथील महानगरपालिका शाळेतील हा प्रकार असून, उम्मेखैर मुजम्मिल असे मुलीचं नाव आहे. या घटनेनंतर पालकांमध्ये संतपाचे वातावरण आहे. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे. सोमवारी (ता. 25) रोजी सकाळी शाळा भरली आणि दुपारी साडेबारा वाजता सुटली. काही वेळाने शाळेसाठी नियुक्त केलेला वॉचमन विठ्ठल बमने सर्व खोल्यांना कुलूप लावून निघून गेला. मात्र, पहिल्या वर्गात शिकणारी एक चिमुकली वर्गात तशीच राहून गेली. वर्गात कोणीच नसल्याचे लक्षात आल्यावर मुलीने दाराकडे धाव घेतली, पण ते बाहेरून बंद होते. त्यामुळे चिमुकलीने दार ठोठावला पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. घाबरलेल्या मुलीने रडायला सुरवात केली.
शाळेतून मुलीच्या रडण्याचे आवाज येत असल्याने आसपासच्या मुलांनी शाळेत धाव घेतली. त्यांनी खिडकीतून डोकावल्यानंतर त्यांना एका बंद खोलीत मुलगी दिसली. काही वेळात परिसरातील नागरिकही जमा झाले. अखेर खोलीला लावलेले कुलूप तोडून चिमुकलीची सुटका करण्यात आली. तसेच मुलीला आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.
गर्भवती बहिणीला घेऊन घरी निघालेला भावंडांचा हृदयद्रावक शेवट…
हृदयद्रावक! अविनाश घरात एकटाच अभ्यास करत बसला होता अन्…
जादूटोण्याच्या संशय! वृद्धाच्या अंगावर झोपेतच ॲसिड टाकून केली हत्या…
सैराटची पुनरावृत्ती! दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या…
औरंगाबाद हादरले! मंदिरातून घराकडे निघालेल्या चिमुकलीवर अत्याचार…