
लोणावळ्यातील अभय मराठे मृत्यू प्रकरणाला खुनाचे वळण; आजोबांनीच झाडल्या नातवावर गोळ्या…
पुणे : लोणावळ्यात जमिनीच्या वादातून आजोबांनीच नातवाची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे अभय मराठे मृत्यू प्रकरणाला खुनाचे वळण मिळाले आहे. आजोबांसह 5 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणावळ्यातील भुशी गावात अभय मराठे यांचा सुरुवातीला रायफल साफ करत असताना अचानक गोळी सुटल्याने दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली होती. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा शहर पोलिसांनी केलेल्या तपासातून आजोबांनीच नातवाचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
View this post on Instagram
भुशीतील मोतीराम हॉटेलमध्ये 5 ऑक्टोबरला परवानाधारक 12 बोअर रायफलमधून गोळी सुटून अभय मराठे यांच्या छातीत लागली होती. सुरुवातीला हा प्रकार अपघाती गोळीबार असल्याचे समोर आले होते. मात्र, पोलिसांच्या तपासात जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मोतीराम राजीव मराठे (वय ८३) याच्यासह हिरामण मोतीराम मराठे, मनोज हिरामण मराठे, कविता हिरामण मराठे आणि राजश्री दशरथ पवार यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोतीराम मराठे आणि त्यांचे नातू अभय मराठे यांच्यात प्रॉपर्टी वरून वाद सुरू होता. 5 ऑक्टोबर रोजी सुद्धा त्यांच्यात एक व्यवहारातून वाद झाले. दरम्यान या गुन्ह्यानंतर मोतीराम मराठे यांना वाचवण्यासाठी घरच्यांनी देखील प्रयत्न केले. मात्र पोलिसांनी तात्काळ हॉटेल मोतीराममधील वेटर आणि इतर लोकांची चौकशी केल्यानंतर अभय मराठे यांचा अपघाती मृत्यू नसून खून असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय घटनेनंतर सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर काढून लपवल्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही पोलिसांचा आरोप आहे. लोणावळा पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
लोणावळा! अखेर श्रेयाच्या मृत्यूचं गुढ उकललं, तपासात धक्कादायक वळण…
पुणे शहरातील पोलिस अधिकाऱ्याने लोणावळ्यात घेतला गळफास…
लोणावळ्यात युवतींसोबत अश्लील डान्स; 10 जणांवर गुन्हा दाखल; पोलिसांचे आवाहन…
Video: लोणावळा येथे अश्लिल चित्रफीत तयार करणा-या टोळीवर कारवाई; पाहा नावे…
पुणे! सियाच्या फोनमधून ‘मानसी गोविंदपूरकर’चं कनेक्शन समोर! Chat GPT ला विचारलं…

