
अल्पवयीन आरोपींचं वय 18 वरून आता 14 करण्याचा विचार: अजित पवार
पुणे: एखाद्या गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपींचं वय 18 वरून आता 14 करण्याचा विचार सुरू आहे, याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले आहे. अल्पवयीन आरोपीच्या वयाबाबत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याशी देखील याबाबत चर्चा करणार असून त्यांना याबाबतचे पत्र लिहणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
बारामतीत पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘कायद्यात बदल करता आला तर ते 18 वर्षाऐवजी ते 14 करता येईल का याबाबत विचार आहे. 17 वर्षांच्यांना माहिती आहे, आपण यामध्ये अडकू शकत नाही, त्यामुळे त्यांच्या चुकांमुळे ते फार अडकत नाहीत, म्हणूनच अल्पवयीन आरोपींच वय 18 वरून 14 करण्यात यावे, याबाबतचा कायदा करताना केंद्र सरकारला याबाबत सांगावे लागेल. मी अमित शहा यांच्याशी काल वेगळ्या विषयावर बोललो, तसा पुन्हा त्यांची भेट झाल्यानंतर किंवा काही कारणास्तव मी दिल्लीला गेल्यानंतर मी त्यांना याबाबत सांगणार आहे. वाटल्यास त्याबाबत पत्र देखील देणार आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील याबाबत सांगणार आहे. याबाबतचे पत्र देण्याची नितांत गरज आहे.’
एखाद्या अल्पवयीन आरोपीच्या गुन्ह्यासाठी पालकांना जबाबदार धरत शिक्षेची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. गुन्हा आणि त्याचे गांभीर्य यासाठी तीन वेगवेगळ्या स्वरूपाच्या शिक्षांची तरतूद केरण्यात आलेली आहे. सौम्य स्वरूपाच्या गुन्ह्यासाठी 6 महिने ते 3 वर्षांची शिक्षा, गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यासाठी 7 वर्षांपर्यंत शिक्षा, अतिगंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यासाठी 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद केली आहे. आरोपीवर सज्ञान म्हणून खटला चालवण्यासाठी त्याचा निर्णय बालन्याय समितीला घेता येतो.
बाल न्याय कायदा, 2015च्या कलम 15 नुसार अतिगंभीर गुन्ह्यांचा आरोप असलेल्या, 16 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर प्रौढ म्हणून खटला चालवता येतो. 2015 कायद्यांतर्गत गुन्ह्यांचं वर्गीकरण अतिगंभीर, गंभीर आणि किरकोळ असे केले जाते. गंभीर गुन्हा म्हणजे ज्यात किमान 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणात अशाच प्रकारे अल्पवयीन आरोपींवर गुन्हा दाखल झाला होता.
अल्पवयीन मुलीला तपासल्यानंतर बसला मोठा धक्का; नराधाम निघाला…
पुणे शहरात अल्पवयीन मुलांकडून वाहन चोरीचे आठ गुन्हे उघड…
पुणे शहरात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; टँकरनं अनेकांना उडवले…
धक्कादायक! पुणे शहरात दोन अल्पवयीन मुली एकत्र प्यायल्या दारू अन् पुढे…
पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीने लिहिलेला निबंध आला समोर…
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?
पुणे शहरात कामाच्या ताणामुळे युवतीचा मृत्यू; अजित पवार म्हणाले…
Video: अजित पवार यांनी ताफा थांबवून अपघातग्रस्ताला केली मदत…

