
येरवडा पोलिसांनी सराईत आरोपीकडून २ गुन्हे आणले उघडकीस अन्…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील सराईत आरोपीकडून २ गुन्हे उघडकीस आणून २,२१,००० /- रु किंमतीचा मुद्देमाल येरवडा तपास पथक कडून हस्तगत करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
पुणे शहरामध्ये वाढत्या वाहनचोरीचे अनुषंगाने पोलिस आयुक्त, पोलिस सहआयुक्त, अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ-४, सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर यांनी हद्दीमध्ये पेट्रोलिंग करुन वाहनचोरी गुन्हे उघडकीस आणणेच्या अनुषंगाने सुचना दिलेल्या होत्या. सदर सुचनेच्या अनुषंगाने ०२/१०/२०२४ रोजी येरवडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना तपास पथकाचे पोअं सुशांत भोसले व अनिल शिंदे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन संशयीत व्यक्ती दोन मोपेड गाडी विक्री करण्यासाठी येरवडा येथे येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके, येरवडा पोलिस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहिती वरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले.
तपास पथक अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक सुनिल सोळुंके व अंमलदार सुशांत भोसले, अनिल शिंदे, विजय अडकमोल, स्वप्निल घोलप यांनी तेथे जावून संशयीतांना पळून जात असताना पकडले.
१) यश सागर ओंबाळे, वय २३ वर्षे, रा. दुर्गामाता मंदीराचे जवळ,कंजारभाट येरवडा पुणे.
२) ओमकार राजेश मोरे, वय २१ वर्षे, रा. स. नं. १४, रामनगर, येरवडा पुणे असल्याचे सांगितले.
त्यांचे ताब्यात दोन मोपेड गाडी व ६ मोबाईल मिळाले सदरबाबत चौकशी करता उडवाउडवीची उत्तरे देवू लागल्याने भारतीय नागरीक सुरक्षा संहीता २०२३ चे कलम ३५(ई) अन्वये कारवाई करण्यात आली. आरोपीकडील गाडयाबाबत चतु श्रृंगी पो स्टे कडील अभिलेख पडताळून पाहिला असता चतुश्रृंगी पो स्टे गु र नं ६८१ / २४ बीएनएस ३०३ (२) व शिक्रापुर पो स्टे गु र नं ७९६ / २४ बीएनएस ३०३ ( २ ) अन्वये गुन्हा दाखल असल्याने सदरचे २ गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्हयातील चोरीस गेलेल्या २ मोपेड गाडी व ६ मोबाईल असा एकूण ०२, २१,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, रंजनकुमार शर्मा, पोलिस सह-आयुक्त, मनोज पाटील, अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, हिम्मत जाधव, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ-४, प्रांजली सोनवणे सहा. पोलिस आयुक्त येरवडा विभाग, रविंद्र शेळके, वपोनि येरवडा, पल्लवी मेहेर, पोनि गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सपोनि सुनिल सोळुंके, पोहवा दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे पोना सागर जगदाळे, पोअं अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, स्वप्निल घोलप, विजय अडकमोल यांनी केली आहे.
पुणे शहरात दोन चिमुकल्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार…
पुणे शहरात महाविद्यालयीन युवतीवर चौघांकडून अत्याचार…
येरवडा पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या टोळीला केले जेरबंद…
येरवडा पोलिसांनी मोक्कातील पाहिजे आरोपीला केले जेरबंद…
दुहेरी खुनातील पाहिजे आरोपीला येरवडा पोलिसांनी केले जेरंबद…

