अल्पवयीन मुलीला तपासल्यानंतर बसला मोठा धक्का; नराधाम निघाला…

नंदुरबार : शहादा तालुक्यात बापानेच आपल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिला गर्भवती केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. नराधम बापाला मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे नंदुरबार जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे.

शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील एका बापाने (वय 40) एप्रिल 2024 ते जुलै दरम्यान अत्याचार केला आहे. स्वतःच्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीशी राहत्या घरी ती एकटी असताना शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केले. तसेच सदर घटना कोणाला सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली. त्यामुळे त्या मुलीने वडिलांचा अत्याचार सहन केला. मात्र, पोट दुखत असल्याने तिच्या आईने दवाखान्यात नेले असता ही बाब उघडकीस आली. त्याबाबत विचारले असता मुलीने वडिलांनीच अत्याचार केल्याचे सांगितले. हे ऐकून आईला मोठा धक्का बसला.

आईने आपल्या मुलीसह शहादा पोलीस स्टेशन गाठत गुन्हा दाखल केला. आईच्या फिर्यादीवरून संशयिता विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

संतापजनक! शिक्षकानं आधी विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवला अन्…

बदलापूर प्रकरण! आरोपी अक्षय शिंदे याची चिमुकल्यांसमोर ओळख परेड…

महाविद्यालयातील मुलींच्या बाथरुममध्ये छुपा कॅमेरा; 300 व्हिडिओ…

पुणे हादरलं! आईच्या प्रियकराचे अल्पवयीन मुलीसोबत संतापजनक कृत्य…

नात्याला काळीमा! अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समजताच आईला बसला धक्का…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!