पुणे शहरात रंग लावण्यावरून युवकावर कोयत्याने केले सपासप वार…

पुणे: पुणे शहरात ऐन होळीच्या दिवशी रंग लावण्याच्या कारणातून झालेल्या वादानंतर दोन जणांनी एका युवकावर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात संबंधित युवक गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

धुलीवंदनाच्या दिवशी रात्री साडे आठ वाजता येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत संगमवाडी परिसरात ही घटना घडली आहे. फिर्यादी ऋतिक आणि यांचे भाऊ रोहित ननावरे (वय १७) हे राजीव गांधी नगर परिसरातून जात होते. यावेळी दोन युवकांनी त्यांना अडवले. जबरदस्तीने रंग लावून त्यांच्या डोक्यावर अंड फोडले. ही बाब रोहितने भाऊ ऋतिकला सांगितली.

भावावर रंग टाकल्याचा जाब विचारायला ऋतिक आरोपींकडे गेला. पण आरोपी बबल्या आणि त्याच्या मित्राने दोघांनी मिळून ऋतिकला बेदम मारहाण केली. आरोपींनी ऋतिकवर कोयत्याने वार केले. शिवाय, पोटात दगड घातला. या हल्ल्यात ऋतिक जखमी झाला आहे. यानंतर त्यांनी तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात धाव घेतली. येरवडा पोलिसांनी बबल्या (पूर्ण नाव माहिती नाही) आणि त्याचा मित्र अशा दोघांवर हत्येच्या प्रयत्नासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

बीड! प्रेमसंबंधातून युवकाला बेदम मारहाण करत जागेवरचं संपवलं…

बीड! शिक्षकानं हृदयद्रावक पोस्ट लिहून संपवलं आयुष्य; मुंडेंनी खूप छळ केला…

हृदयद्रावक! धुळवडीच्या दिवशी दोन मावस भावांचा धरणात बुडून मृत्यू…

होळीची पोळी पोलिसांना दुसऱ्या दिवशी खावी लागते शिळी…

पुणे पोलिसांनी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झालेबाबतचा खोटा बनाव केला उघड…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!