
IPS अधिकारी राहुल बन्सल लाच प्रकरणात अडकले; मुलाखतीदरम्यान म्हणाले होते…
नवी दिल्ली : नागरी सेवा परीक्षेची तयारी करत असताना तयारीदरम्यानच्या मुलाखतीदरम्यान ५०० रुपयांची लाचही घेतली जाऊ नये, असे सांगणारे IPS अधिकारी राहुल बन्सल सध्या एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणात अडकले आहेत. २०२२ च्या तुकडीचे छत्तीसगड केडरचे आयपीएस अधिकारी राहुल बन्सल यांच्यावर सायबर फसवणूक प्रकरण सोडविण्यासाठी एक कोटींची लाच मागितल्याचा आरोप आहे.
नागरी सेवेच्या तयारीदरम्यानचा राहुल बन्सल यांचा एक जुना मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये देशातील भ्रष्टाचार, प्रशासकीय त्रुटी आणि पोलिस प्रशासनातील सुधारणांवर ते मते मांडताना दिसून येत आहेत. मात्र, प्रत्यक्ष सेवेत काम करीत असताना भ्रष्टाचारापासून ते स्वत:ला दूर ठेवू शकले नाहीत, असे नेटिझन्स म्हणत आहेत.
View this post on Instagram
जेव्हा माझा भाऊ आयआयटी कानपूरमध्ये शिकत होता, तेव्हा त्याला एका रिसर्च पेपर सादरीकरणासाठी अमेरिकेला जावे लागणार होते. त्यासाठी त्याला तातडीने जन्म दाखल्याची गरज होती. तो दाखला वेळेत बनवून देण्यासाठी एका पंचायत अधिकाऱ्याने माझ्याकडे ५०० रुपयांची लाच मागितली होती. मला ५०० रुपयांची लाच देताना अत्यंत वाईट वाटले होते, असे बन्सल मुलाखतीत सांगतात. मात्र ते स्वत: अधिकारी झाल्यानंतर मात्र १ कोटींची लाच मागतात, असे नेटिझन्स म्हणत आहेत.
एका सायबर फ्रॉड प्रकरणात संबंधित विषय मिटवण्यासाठी आणि आरोपींवर कारवाई न करण्यासाठी ही रक्कम लाच म्हणून उकळल्याचा आरोप आहे. दिल्लीच्या एका विशेष CBI न्यायालयात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत राहुल बन्सल यांच्यासोबतच सहायक उपनिरीक्षक प्रवीण कुमार राठोड आणि कॉन्स्टेबल अंशुल शर्मा यांचीही नावे समाविष्ट आहेत.
दिल्लीतील न्यायालयातील झालेल्या तक्रारीनुसार, १ कोटी रुपयांची ही रक्कम एकाच वेळी न देता मे २०२६ दरम्यान ५०-५० लाख रुपयांच्या दोन हप्त्यांमध्ये एका मध्यस्थामार्फत स्वीकारली गेली. तक्रारदाराने आपल्या दाव्याच्या अनुषंगाने काही डिजिटल पुरावे न्यायालयासमोर सादर केले आहेत. यामध्ये पैशांच्या व्यवहाराशी संबंधित व्हॉट्सॲप चॅट्स आणि कॉल रेकॉर्डिंग्ज न्यायालयाला दिले आहेत. IPS अधिकारी लाच प्रकरणात अडकल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष न्यायालयाने छत्तीसगडचे पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या संचालकांना या प्रकरणी नेमकी काय कारवाई केली, याचा विस्तृत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
पोलिस अधिकाऱ्याला लाच घेताला रंगेहात पडकले, थेट बेड्या…
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील लाचखोर उपनिरीक्षकाच्या घरात मिळालं घबाड…
पोलिस दलात खळबळ! लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा दाखल…
साताऱ्यात लाच घेणाऱ्या न्यायाधीश प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिस अधिकारी…

