
अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करणारे स्पेशालिस्ट संजय शिंदे आहेत कोण?
ठाणे : बदलापूरमध्ये शाळेत दोन लहान चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (ता. २३) एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन तळोजा कारागृहातून ठाण्याकडे आणत असताना अक्षय शिंदे याने पोलिसांचे रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे जखमी झाले. तेव्हा स्वसंरक्षणार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षाक संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळ्या झाडल्या. यातली एक गोळी अक्षयच्या डोक्याला लागली. गोळीबारात तो गंभीर जखमी झाला. आरोपी अक्षय शिंदे आणि एपीआय नीलेश मोरे या दोघांनाही कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे अक्षय शिंदे याला मृत घोषित करण्यात आले.
अक्षय शिंदे याच्यावर गोळ्या झाडणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी याआधी माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असणाऱ्या प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले होते. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षात काम करण्याचाही त्यांना अनुभव आहे. प्रदीप शर्मां यांच्या नेतृत्वाखाली काम करताना संजय शिंदे हे दाउद गँगविरोधातल्या मोहिमेतही सहभागी झाले होते.
प्रदीप शर्मा यांनी १९९० च्या दशकात दाऊद इब्राहिम आणि छोटा राजनच्या टोळ्यांमधील गुंडांना टार्गेट केले होते. दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला त्यांनी अटक केली होती. त्या पथकातही संजय शिंदे हे होते. याआधी संजय शिंदे यांनी मुंबई पोलिसात काम केले आहे. बदलापूर बलात्कार प्रकरणी तपासात राज्य सरकारकडून स्थापन केलेल्या एसआयटी पथकातही ते आहेत.
दरम्यान, संजय शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. एका खून प्रकरणातील आरोपी विजय पालांडे हा पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला होता. पालांडेला पळून जायला मदत केली असा आरोप तेव्हा संजय शिंदे यांच्यावर होता. पालांडेच्या गाडीत संजय शिंदे यांचा गणवेश सापडला होता. त्यावेळी संजय शिंदे यांना निलंबित केले होते. पण २०१४ मध्ये मुंबई पोलिसात संजय शिंदे यांना पुन्हा कामावर घेण्यात आले होते.
अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरची A टू Z स्टोरी…
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर झाडली गोळी!
बदलापूर प्रकरण! अक्षय शिंदे याची दुसरी पत्नीही आली समोर: म्हणाली लिंगपिसाट…
बदलापूर प्रकरण! आरोपी अक्षय शिंदे याची चिमुकल्यांसमोर ओळख परेड…
बदलापूर प्रकरण! अक्षय शिंदे याच्या पहिल्या पत्नीकडून धक्कादायक खुलासे…
बदलापूर प्रकरणात नवं ट्विस्ट; आरोपीचे आई-वडिल म्हणाले…
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या वडिलांचा खळबळजनक आरोप…
धक्कादायक! बदलापूरच्या आरोपीची झाली 3 लग्न; पाहा त्याची कुंडली…
Video: बदलापूरातील शाळेत चिमुकलींवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे आहे कोण?…
बदलापूर आंदोलकांवर कारवाई; 300 जणांवर गुन्हा तर 28 जणांना अटक…
बदलापूर हादरलं! दोन चिमुकल्यांवरील अत्याचाराची A टू Z कहाणी…
बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी पोस्ट पाहा…
संतापजनक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या चिमुकलीचा घोटला गळा अन्…
धक्कादायक! पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून वर्गातील मुलाने केली महिलेची हत्या…
बिहारमधील शिक्षकाने पुण्यात येऊन चिरला पत्नीच्या प्रियकराचा गळा अन्…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

