
Video: अजित पवार यांनी ताफा थांबवून अपघातग्रस्ताला केली मदत…
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज (मंगळवार) पुणे दौऱ्यावर आहेत. आज सकाळी ते शिवाजीनगर येथील निवासस्थान येथून सर्किट हाऊसच्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी शिवाजीनगर परिसरातील संचेती हॉस्पिटलच्या पुलाखाली एका दुचाकीस्वाराचा आणि रिक्षाचा अपघात झाला. यावेळी पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांनी तत्परता दाखवत ताफा थांबवून अपघातग्रस्तांना मदत केली.
अजित पवार यांनी अपघात झालेल्या व्यक्तीची विचारपूस केली, त्यांना धीर दिला. ताफ्यातील अँब्युलन्समधील डॉक्टर यांना ताबडतोब उपचार करण्यासाठी देखील त्यांनी सांगितले. त्यानंतर अजित पवार आपल्या पुढील नियोजित कामासाठी रवाना झाले. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, अपघातग्रस्तांना अजित पवार मदत करताना त्यांच्याशी बोलताना व्हिडिओमध्ये दिसत आहे, एक व्यक्ती अपघात झाल्यावर खाली पडल्याचे दिसत आहे. यावेळी अजित पवार यांच्या गाड्यांचा ताफा थांबतो. अजित पवार यांच्या ताफ्यातील कर्मचारी, सुरक्षारक्षक अपघातग्रस्त व्यक्तीच्या मदतीला येताना दिसतात. अजित पवार देखील गाडीतून उतरतात आणि कोणाला तरी फोन करून सूचना देताना दिसतात. त्यानंतर ते जखमी व्यक्तीजवळ जातात आणि त्याची विचारपूस करतात. या अपघातात तो व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याचं व्हिडिओमधून दिसते आहे. जखमी व्यक्तीला सर्व प्रकारची मदत करण्याच्या सूचना देऊन अजित पवार आपल्या पुढील नियोजित कामासाठी रवाना होतात. या व्हिडिओमधून अजित पवार यांची कार्यतत्परता दिसून येते आहे, यामुळे त्यांचे कौतुक देखील केले जात आहे.
अजित पवार यांनी अपघात कसा काय झाला? असे दुचाकीस्वाराला विचारले. त्यावर रिक्षा आडवी आल्याने किरकोळ अपघात झाला. जास्त लागले नाही फक्त हाताला खरचटले आणि अंगठ्याला लागले असल्याचे अपघातग्रस्त व्यक्तीने सांगितले. मी ठीक आहे, असे दुचाकीस्वाराने अजित पवार यांना सांगितले. अपघातग्रस्तावर ‘संचेती’ रुग्णालयात प्राथमिक उपचार करा, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या व त्यानंतर ते आपल्या पुढील कामासाठी रवाना झाले.
वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट; हत्यारे पुरवणारा आरोपी…
पुणे शहरात मद्यधुंद चालकाने मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीला चिरडलं…
Video: ‘पीएमपीएल’ बस चालकाने बेशिस्त कार चालकाला घडवली अद्दल…
Video: पुणे शहरातील जखमी पोलिस अधिकाऱ्याचा कर्तव्यबाणा; पाहा आरोपींची अवस्था…

