थरार! दोन मित्रांवर सात ते आठ जणांनी केले सपासप वार…

नागपूर : राजीवनगर बसस्टॉपजवळ असलेल्या एका पान टपरीवर बसलेल्या दोन मित्रांवर सात ते आठ हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना बुधवारी (ता. 16) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

राकेश मिश्रा (वय 27) याचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रवी जयस्वाल (वय 28, दोघेही रा. राजीवनगर, हिंगणा रोड नागपूर) याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघेही या भागात आरटीओशी संबंधित कागदपत्रे तयार करण्याचे काम करत होते.

दोघे मित्र दररोज सायंकाळी बसस्टॉपवर येऊन बाजूला एका टपरीवर बसायचे. बुधवारी रात्री पण तिथे बसले होते. काही अंतरावर कारमधून 6 ते 7 जण उतरले. त्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते. राकेश आणि रवीच्या जवळ येऊन त्यांनी अचानक धारदार हत्याराने सपासप वार सुरु केले. राकेश हा जखमी होऊन जागीच निपचित पडला. तर रवी हा जीव वाचवण्यासाठी बाजूला असलेल्या एका महिला डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये घुसला आणि काचेचे केबिन आतून बंद करुन घेतले. आरोपी त्याचा पाठलाग करत तिथे पोहोचले. त्यांनी काचेची केबिन फोडून आतमध्ये घुसून रुग्ण आणि डॉक्टर समोरच त्यालाही गंभीर जखमी केले आणि कारमध्ये बसून फरार झाले.

एमआयडीसी पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच ठाणेदार भीमा नरके आणि स्टाफ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. हा हल्ला नेमका कशासाठी झाला हे कळू शकलेले नाही. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले आहेत. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

धक्कादायक! दारू पार्टीदरम्यान मित्राचे गुप्तांग कापले अन् पुढे…

पुणे हादरले! मंगला टॉकीजसमोर युवकाची निर्घृण हत्या…

भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणात पुढील अपडेट…

RPF आरोपीचा अजब दावा; रेल्वेमधील हत्याकांडाचा घटनाक्रम…

जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांची हत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!