धक्कादायक! पुणे शहरात दोन अल्पवयीन मुली एकत्र प्यायल्या दारू अन् पुढे…

पुणे : पुणे शहरातील येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 16 वर्षांच्या मुलीने दारुच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

दोन अल्पवयीन मैत्रिणी एकत्र दारु प्यायल्या. पण, त्यानंतर दोघींना उलट्या झाल्या. अत्यवस्थ असलेल्या मुलीने त्यांच्या ओळखीच्या मित्राला फोन करून बोलावल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

मिळालेली माहितीनुसार, येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत वडार वस्ती येथे १६ वर्षांची मुलगी राहत होती. तिच्याच वयाच्या दुसऱ्या एका मैत्रिणीसोबत मिळून दोघींनी घरीच दारू पिण्याचे ठरवले. दोघींनी घरी दारु प्यायल्यानंतर त्यांना उलट्या झाल्या. यानंतर एका १६ वर्षांच्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केली. दुसरी मुलगी दारुचे अतिसेवन केल्याने अत्यवस्थ होती. त्याच अवस्थेत तिने दोघींच्या मित्राला कॉल करून घरी बोलावले.

मित्र घरी पोहोचला तेव्हा त्याला दृष्य पाहून धक्का बसला. एक मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती तर दुसरी मुलगी अत्यवस्थ होती. त्याने गळफास घेतलेल्या मुलीच्या गळ्यातली ओढणी काढून खाली उतरवले आणि तोंडावर पाणी मारले. त्यानंतर तिच्या आईला बोलावून आणले. गळफास घेतलेल्या मुलीला रुग्णालयात नेण्यात आले पण तिचा आधीच मृत्यू झाला होता. बेशुद्धावस्थेत असलेल्या मुलीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! पुणे शहरात छेडछाडीला कंटाळून युवतीने घेतले पेटवून…

पुणे: ‘मुळशी पॅटर्न’मधील पिट्या भाईंनी युवतींचा धक्कादायक Video आणला समोर…

धक्कादायक! पुणे शहरात प्रियकराने घरात घुसून प्रेयसीच्या आईचा केला खून…

धक्कादायक! पुणे जिल्ह्यातील शाळेच्या बाथरूमध्ये मुलीवर बलात्कार…

IAS पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!