समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कुटुंबावर काळाचा घाला…

वाशीम : समृद्धी महामार्गावरील अनेक वाहनांना झालेल्या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. महामार्गावरील अपघाताचे सत्र काही केल्या कमी होत नाही. मंगळवारी (ता. १९) संध्याकाळी गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला जाणाऱ्या कारचा वन्यप्राण्याला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहे.

वाशिम जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी वनोजा कारंजा दरम्यान चॅनल क्रमांक 196 जवळ हा अपघात झाला. दुरतकर कुटुंबीय गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला या मार्गाने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान अचानक वन्यप्राणी लावलेले कठडे ओलांडून आल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाला. या अपघतात एक मृत्युमुखी तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, महामार्गावर हरणे, नीलगायी तसेच श्वान प्रवेश करत असल्यामुळे अपघात घडत आहेत. या मार्गावर वन्य प्राण्यांसाठी बनवण्यात आलेले ओव्हरपास आणि अंडर पास हे फोल ठरले असल्याचे देखील सिद्ध झाले आहे. समृद्धी महामार्गावर अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत लहान-मोठे 729 अपघात झाले असून त्यापैकी 47 अपघात जीवघेणे ठरले आहेत. या 47 अपघातात 101 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, इतर 99 अपघातात 262 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. राज्य पोलिसांच्या “महामार्ग सुरक्षा” दलाने समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातांचा खास अभ्यास केला असून त्या आधारावर तयार केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

समृद्धी महामार्गावर फोटो, व्हिडीओ काढाल तर तुरुंगात जाल…

समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना; 18 जणांचा मृत्यू…

समृद्धी महामार्गावर मृत्यूमुखी पडलेल्या २५ प्रवाशांना श्रद्धांजली; गुन्हा दाखल…

समृद्धी महामार्गावर २५ होरपळून मृत्यू; चालकाबाबत धक्कादायक माहिती समोर…

समृद्धी महामार्ग एक Live अनुभव अन् बरंच काही…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!