
पुणे शहरात अल्पवयीन मुलांकडून वाहन चोरीचे आठ गुन्हे उघड…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात दुचाकी चोरणा-या विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून एकुण ०८ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणून एकूण ०५ दुचाकी गाडया व ०३ ऑटो रिक्षा जप्त करण्यात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस आयुक्त यांनी पुणे शहरामध्ये दुचाकी वाहनांचे चोरीला आळा बसावा याकरीता विशेष मोहिम राबवुन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील अधिकारी व अंमलदार असे वारजे माळवाडी पोलिस स्टेशन कडील गुन्हा रजि नं ३१२/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) या गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा व चोरीस गेले दुचाकी गाडीचा शोध घेत होते. पोलिस अंमलदार ८७३२ साईकुमार कारके यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फेतीने बातमी मिळाली की, संजय काकडे यांचे मिळकत असलेल्या मोकळया जागेजवळ, रामनगर, वारजे माळवाडी, पुणे येथे असलेल्या मोकळ्या मैदानाजवळ एक मुलगा गुन्हयातील चोरीस गेली दुचाकी गाडीसह उभा आहे. सदरची गाडी ही चोरीची असलेबाबतची बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन नमुद मुलाचे ताब्यात मिळून आलेल्या मोटार सायकलीचे चासिस नंबर व इंजिन नंबर वरुन माहिती काढली व गुन्हे अभिलेखावरील अभिलेख पाहता सदर मोटार सायकलबाबत वारजे माळवाडी पोलिस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा रजि नं ३१२/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंद असलेबाबत माहिती समजली.
निखील पिंगळे यांची गुन्हे शाखा उपायुक्तपदी नियुक्ती; अमोल झेंडे यांच्याकडे वाहतूक विभाग…
विधीसंघर्षग्रस्त बालकाकडे त्याचे पालकांसमक्ष आणखीन चौकशी करता त्याने ०३ ऑटो रिक्षा व ०५ दुचाकी गाडया चोरी केल्याचे सांगितल्याने
नमुद विधीसंघर्षग्रस्त बालकाकडुन एकुण ०८ वाहने जप्त करुन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
१) वारजे माळवाडी पोलिस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजि.नं. ३१२/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२)
२) वारजे माळवाडी पोलिस स्टेशन, शहर गुन्हा रजि.नं. ३२०/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२)
३) कोथरुड पोलिस स्टेशन, गुन्हा रजि.नं. २३३/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२)
४) सिंहगड रोड पोलिस स्टेशन, गुन्हा रजि. नं. ४६४/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२)
५) येरवडा पोलिस स्टेशन, गुन्हा रजि.नं. ५१७/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२)
६) येरवडा पोलिस स्टेशन, गुन्हा रजि.नं. ५१८/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२)
७) येरवडा पोलिस स्टेशन, गुन्हा रजि. नं. ४२६/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२)
८) शिक्रापुर पोलिस स्टेशन, पुणे ग्रामीण, गुन्हा रजि.नं. ७८१/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२)
वरील नमुद विधीसंघर्षग्रस्त बालकाकडुन पुणे शहरचे ०७ व शिक्रापुर पो.स्टे. पुणे ग्रामीण कडील ०१ असे एकुण ०८ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणुन त्याचेकडुन किं रु २,५०,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलिस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा.पोलिस आयुक्त गणेश इंगळे, गुन्हे शाखा १, पुणे शहर व दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलिस हवालदार बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, पोलिस नाईक रविंद्र लोखंडे, पोलिस अंमलदार साईकुमार कारके, महेश पाटील, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, नारायण बनकर, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
धक्कादायक! बदलापूरच्या आरोपीची झाली 3 लग्न; पाहा त्याची कुंडली…
बलात्कार पीडितेचे नाव, फोटो शेअर केल्यास शिक्षा…
पुणे शहरात वॉचनमचा खुनाचा प्रयत्न करणारे दोघे २४ तासांत अटक…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाला नवं वळण; आणखी दोघांना अटक…
पुणे शहरातील गणेशोत्सवासाठी पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय…
Video: पुणे शहरात भर पावसात महिला पोलिस अधिकाऱ्याकडून वाहतूक नियंत्रण…

