पुणे शहरात कामाच्या ताणामुळे युवतीचा मृत्यू; अजित पवार म्हणाले…

पुणे: पुणे शहरातील अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) कंपनीच्या ऑफीसमध्ये काम करणारी सीए अॅना सेबॅस्टियन पिरेयिल (वय २६, रा. केरळ) हिचा अतिकामामुळे आणि तणावामुळे बळी गेल्याचा आरोप पत्र लिहून तिच्या आईने केला आहे. या घटनेनंतर मोदी सरकारने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. शिवाय, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या घटनेबाबाबत भावना केली व्यक्त केली आहे.

युवतीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने बॉसला लिहिले पत्र…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेबाबाबत भावना करताना म्हटले आहे की, ‘पुण्यातील ईवाय कंपनीमधील २६ वर्षीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूबद्दल ऐकून खूप दुःख झाले. कामाच्या तणावामुळे तरुणांच्या मृत्यूच्या वाढत्या घटनांकडे लक्ष देण्याची गरज आहे. मला आशा आहे की, ईवाय कंपनी सुधारात्मक पावले उचलेल,’अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.’

बिग ४ अकाउंट फर्मच्या EY कंपनीच्या पुण्याच्या शाखेत अॅना सेबेस्टियन पिरेयिल नावाची युवती काम करत होती. तिचा मृत्यू झाला आहे. एनाच्या मृत्यूनंतर तिच्या आईने भारतातील कंपनीचे प्रमुख राजीव मेमानी यांना पत्र लिहिले आहे. आपल्या लेकीने कंपनी जॉइन केल्यापासून ती नेहमीच कामाच्या तणावाखाली रहायची. एनाने मार्च २०२४ मध्ये कंपनी जॉइन केली होती. तिचा मृत्यू 20 जुलै रोजी झाला होता. अॅनाच्या आई अनिता सेबॅस्टियन यांनी कंपनीवर गंभीर आरोप केल्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे.

अॅना सेबॅस्टियन पेरायलच्या मृत्यूमुळे दुःख झाले. असुरक्षित आणि शोषण होणाऱ्या वातावरणात काम करावे लागत असल्याच्या आरोपांची सखोल चौकशी सुरु आहे. आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहोत. कामगार मंत्रालयाने या प्रकरणी अधिकृतपणे तक्रार नोंदवून घेतली आहे, अशी माहिती केंद्रीय कामगार विभागाच्या राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी दिली आहे.

सिंघम IPS शिवदीप लांडे यांचा पोलिस सेवेतून राजीनामा; कोण आहेत शिवदीप लांडे…

पुणे जिल्ह्यातील दोन मैत्रिणी मित्राच्या खोलीवर गेल्या अन् दारु पाजून अत्याचार…

धक्कादायक! पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून वर्गातील मुलाने केली महिलेची हत्या…

बिहारमधील शिक्षकाने पुण्यात येऊन चिरला पत्नीच्या प्रियकराचा गळा अन्…

पुणे शहरातील एकाने पत्नीला Live Location बरोबरच मेसेज केला अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!