
नागपूर! वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या मुलीचा फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह…
नागपूर: ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ (एम्स) मधून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने तिच्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत विद्यार्थिनी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (CRPF) उपमहानिरीक्षक कृष्णकांत पांडे यांची मुलगी आहे. तिच्या आत्महत्येमुळे संपूर्ण ‘एम्स’ कॅम्पसमध्ये खळबळ उडाली असून, तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला
आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव समृद्धी कृष्णकांत पांडे (वय २५, रा. मंजिरा अपार्टमेंट, शिव कैलास, मिहान) असे आहे. समृद्धी ‘एम्स’मध्ये त्वचारोग विभागाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत होती. २५ जुलैपासून एका मैत्रिणीसोबत मिहान परिसरातील फ्लॅटमध्ये ती राहत होती. तिची मैत्रीणही त्याच विभागात शिक्षण घेत आहे.
बुधवारी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी तिची मैत्रीण ‘एम्स’मध्ये गेली, त्यावेळी समृद्धी घरी एकटीच होती. रात्री आठ वाजता मैत्रीण फ्लॅटवर परतली तेव्हा दरवाजा आतून बंद होता. मैत्रिणीने तिच्याकडील चावीने दरवाजा उघडला. तेव्हा समृद्धी हॉलमध्ये ओढणीने सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. या घटनेमुळे घाबरलेल्या मैत्रिणीने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक गोळा झाले आणि त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
समृद्धीचे वडील कृष्णकांत पांडे हे पुणे येथे ‘सीआरपीएफ’चे उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक नक्षलग्रस्त भाग तसेच जम्मू-काश्मीरमध्ये प्रतिकूल परिस्थितीत काम केले आहे. पांडे कुटुंबीयांसाठी समृद्धीच्या या टोकाच्या पावलामुळे मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, कृष्णकांत पांडे यांनी समृद्धीला फोन केला होता, पण तिने बराच वेळ फोन उचलला नाही. त्यामुळे त्यांनी तिची प्रकृती ठीक आहे की नाही, या शंकेने तिच्या मैत्रिणीला फोन केला. मैत्रिणीने घरी जाऊन पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पांडे आणि त्यांचे कुटुंबीय तातडीने नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. समृद्धी ही अभ्यासात अत्यंत हुशार होती, पण गेल्या काही दिवसांपासून ती तणावात होती, अशी माहिती मिळत आहे. तिने हे टोकाचं पाऊल नेमकं कोणत्या कारणामुळे उचललं, याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही. सोनेगाव पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
डॉक्टर शुभांगी वानखडे यांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण…
पुणे शहरातील ‘रुबी हॉल’मधील डॉक्टरची आत्महत्या; मोबईलचा पासवर्ड…
सोलापूर! MBBSचे शिक्षण घेणाऱ्या साक्षीने टोकाचा निर्णय का घेतला…
पुणे! MBBSच्या विद्यार्थ्याने चिठ्ठी लिहून घेतला जगाचा निरोप; भावनिक चिठ्ठी..
महिला डॉक्टरने तणाव आणि निराशेतून केली आत्महत्या…

