आंदेकर X कोमकर! कृष्णा आंदेकर पोलिसांना आला शरण…

पुणे: पुणे शहरातील नाना पेठ परिसरात झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंदेकर हा स्वत:हून समर्थ पोलीस ठाण्यात पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे. आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर याचा कृष्णा आंदेकर हा मुलगा आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!

कृष्णा आंदेकर याला आज (मंगळवार) सकाळी अटक केल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. कृष्णा आंदेकर मागील अकरा दिवसांपासून कुठे होता? त्याला लपण्यासाठी कोणी मदत केली? त्याचा आयुष कोमकर हत्या प्रकरणात काय हात आहे? याचा सविस्तर तपास आता पुणे पोलीस करत आहेत. एकूणच आयुष कोमकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी आता पोलिसांच्या अटकेत आहेत. कृष्णा आंदेकर याची माहिती दे, नाहीतर त्याला थेट गोळ्या घालू, अशी धमकी दिल्याचा दावा बंडू आंदेकर याने सोमवारी न्यायालयात केला होता. त्यानंतर आज कृष्णा आंदेकर आज पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे.

दरम्यान, कृष्णा आंदेकर याची माहिती दे, नाहीतर त्याला थेट गोळ्या घालू, अशी धमकी दिल्याचा दावा बंडू आंदेकर याने सोमवारी न्यायालयात केला होता. तसेच इतर आरोपींना पोलिस कोठडीत बेदम मारहाण झाल्याच्या, जीवनावश्यक गरजा पूर्ण होत नसल्याची तक्रार केली. पोलिसांनी गेल्या आठवडाभरापासून आपल्याला अंघोळ करू दिली नाही, तसेच कपडेही बदलू देत नसल्याचा आरोप केला. त्यावर, न्यायाधीश साळुंखे यांनी आरोपी मेरगू याला कोठे मारहाण झाली? अशी विचारणा करून अंगावरील वळ दाखविण्यास सांगितले. याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त करत आरोपींना आवश्यक त्या वस्तू पुरविण्याची सूचना तपास अधिकाऱ्यांना केली. आरोपींना धमकी दिल्याचा आणि मारहाण केल्याचा आरोप तपास अधिकारी असलेले सह पोलिस आयुक्त शंकर खटके यांनी फेटाळला आहे.

नाना पेठेत ५ सप्टेंबर रोजी झालेल्या आयुष कोमकर हत्याकांडात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत आतापर्यंत १२ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अटकेत असलेल्या आरोपींमध्ये आंदेकर टोळीचा प्रमुख सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि थेट गोळीबार करणारे आरोपी यांचा समावेश आहे. पोलिसांनी ही कारवाई बुलढाणा आणि गुजरातमध्ये केली. गुन्हे शाखेने अटक केलेले शिवराज, शुभम, अभिषेक आणि लक्ष्मी आंदेकर यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. गुजरातमध्ये धडक कारवाई करून पकडलेल्या या चौघांना न्यायालयाने १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या संपूर्ण हत्याकांडाचा सूत्रधार बंडू आंदेकरचा मुलगा आणि मृत माजी नगरसेवक वनराज आंदेकरचा भाऊ कृष्णा आंदेकर असल्याचे समोर आले आहे. त्याच्या सांगण्यावरूनच आयुषची हत्या करण्यात आल्याचा तपासात उलगडा झाला आहे. मात्र, पोलिसांच्या जाळ्यात सर्व आरोपी सापडले असले तरी कृष्णा आंदेकर फरार होता तो आज पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे पोलिसांचा बंडू आंदेकरला मोठा दणका, पाहा महिन्याची कमाई…

आयुष कोमकर हत्या प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई…

आंदेकर X कोमकर! बंडू आंदेकर नातवाच्या हत्येवर पहिल्यांदाच बोलला…

पुणे! बंडू आंदेकरच्या घरावर पोलिसांची धाड; काय-काय सापडलं पाहा…

पोलिसांचा धाक! बंडू आंदेकर मुकाट्याने गुडघ्यावर आला; पण कसा पाहा…

आंदेकर X कोमकर! पुणे पोलिसांनी आंदेकर टोळी विरोधात केली मोठी कारवाई…

आंदेकर X कोमकर! आयुषच्या पार्थिवाला अग्नी देताना बाप ढसाढसा रडला तर हातामध्ये…

आंदेकर X कोमकर! आयुषच्या लहान भावाने पाहिली हत्या सांगितला थरार…

आंदेकर X कोमकर! आयुष कोमकरचा ससूनच्या शवागारातील मृतदेह बाहेर काढणार…

आंदेकर X कोमकर! गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई करणार: पोलिस आयुक्त

पुणे! आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 11 जणांवर गुन्हा दाखल…

वनराज आंदेकर यांची हत्या पुर्वनियोजित कट; पाणीपुरी खात पाळत ठेवली…

वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई…

वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट; हत्यारे पुरवणारा आरोपी…

वनराज आंदेकर यांच्या गळ्यावर 15 नाही तर तब्बल 24 कोयत्याचे वार अन्…

वनराज आंदेकर यांच्या वडिलांचा लेकींना सवाल; आता मी बदला…

वनराज आंदेकर यांच्या हत्येचे खरं कारण समोर…

वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून 13 जणांना उचललं…

वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला होताना बहिण गॅलरीतून म्हणाली; मारा, मारा, सोडू नका…

वनराज आंदेकर! पोलिस तपासात खुनाची दुसरी बाजू समोर…

सूडचक्र! पुणे शहरातील आंदेकर कुटुंबाचा पाच दशकांचा रंक्तरंजीत इतिहास…

वनराज आंदेकर! शत्रूला हाताशी धरून केली गेम, बहिणींना अटक…

वनराज आंदेकर! तुला जगु देणार नाही; पोर बोलावुन ठोकतेच…

Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!