हनिमूनच्या रात्रीपासूनच नवरीला त्रास सुरू; अखेर नको ते घडलं…

पाटणा (बिहार): बिहारमधील औरंगाबादमध्ये हुंड्याच्या हव्यासापोटी सासरच्यांनी नववधूचा खून करून या प्रकरणाला आत्महत्येचे नाव देण्याचा प्रयत्न केला. वधूच्या कुटुंबीयांनी तिच्या सासरच्या मंडळींना आपल्या ऐपतीपेक्षा जास्त हुंडा दिला होता. तरीदेखील ते त्याहून अधिक हुंड्याची मागणी करत होते, असे नवविवाहितीच्या माहेरच्यांनी म्हटले पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

तराई गावात राहणारी संगीता हिचे औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोसदिहरा गावातल्या अमरजित पासवानशी 12 जुलै रोजी लग्न झाले होते. हनिमूनच्या रात्रीपासूनच तिच्याकडे अधिक हुंड्यासाठी मागणी केली जात होती. शिवाय, विवाहानंतर आठच दिवसांनी नवविवाहितेचा जीव गेला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

संगीताच्या माहेरच्या लोकांच्या म्हणण्यानुसार, अमरजितने हनिमूनच्या रात्रीपासूनच मुलीचा छळ करण्यास सुरुवात केली होती. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले होते. त्याला हुंड्यामध्ये एक दुचाकी दिली होती; मात्र लग्नानंतर अमरजितने दुसऱ्या दुचाकीची मागणी सुरू केली. तिच्या सासरच्या मंडळींनीही संगीतावर आणखी हुंडा आणण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. संगीताने हनिमूनच्या दुसऱ्याच दिवशी माहेरच्यांना हा प्रकार सांगितला होता. लग्नानंतर काही दिवसांसाठी नवरी माहेरी आली होती. 18 जुलै रोजी अमरजित संगीताला घेण्यासाठी आला होता. घरी गेल्यानंतर त्याने संगीताला मारहाण केली. संगीताने हा प्रकार तिची धाकटी बहीण सुनीताला सांगितला होता. यानंतर 22 जुलै रोजी अमरजितने संगीताच्या माहेरी फोन करून तिने आत्महत्या केल्याची माहिती दिली.

संगीताच्या माहेरच्यांनी तत्काळ तिच्या सासरी धाव घेतली. तिथे संगीताचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

हनिमूनच्या रात्रीच नवरीला सुरू झाल्या उलट्या अन्…

हनिमूनच्या रात्री नवरदेव लागला मोठ-मोठ्याने ओरडायला…

हनिमूनच्या रात्रीच नवरीने दाखवला खरा चेहरा…

हनिमूनच्या रात्री नवऱ्याला खावू घातली गोळी अन्…

हनिमूनसाठी निघालेल्या पतीला झोपेतून उठल्यावर बसला धक्का…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!