महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निविराला वीरमरण…
बुलढाणा: महाराष्ट्राच्या अग्निविराला सियाचिनमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आले आहे. अक्षय गवते असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे. सियाचिनमधील ग्लेशियरवर कर्तव्य बजावताना प्रकृती ढासळल्याने अक्षय गवते यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे प्राणज्योत मालवली.
जवान अक्षय गवते हे बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील राहणारे आहेत. सियाचिनमध्ये कर्तव्य बजावताना त्यांची प्रकृती ढासळली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निविराला वीरमरण आल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पिंपळगाव सराई येथील वीर जवान अक्षय लक्ष्मण गवते हे सियाचीनमधील ग्लेशियरमध्ये कर्तव्यावर तैनात होते. मात्र कर्तव्य बजावत असताना त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर सैनिकी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांना 20 ऑक्टोबरच्या रात्री हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच अक्षय गवते यांची प्राणज्योत मालवली.
अक्षय गवते हे 30 डिसेंबर 2022 ला अग्निवीर म्हणून सैन्यात दाखल झाले होते. अक्षय गवते हे त्यांच्या आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होते. तर त्यांना लहान बहीण असून त्यांचे आई-वडील शेती करतात. अग्निवीर अक्षय यांच्या वीरमरणाची वार्ता कळताच पिंपळगाव सराई गावावर शोककळा पसरली आहे. पिंपळगाव सराई सारख्या लहानशा गावातून देशाला सेवा करण्याचे अक्षय यांचे स्वप्न आधूरे राहिले.
लेहमध्ये झालेल्या दुर्घटनेत सातारचा जवान हुतात्मा…
जवान पांडुरंग तावरे यांना 12 वर्षीय मुलाने दिला मुखाग्नी…
हृदयद्रावक! जवान वैभव भोईटे यांना दीड वर्षांच्या लेकीने दिला अग्नी…
कौतुकाचा वर्षाव! जवानाचा Video पाहून पाणावतील डोळे…
जम्मू-काश्मीरमध्ये नदी ओलांडताना दोन जवान गेले वाहून…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!