नवी मुंबईतील पोलिस हवालदाराचं भयंकर कृत्य; प्रियकराला संपवलं अन् पुढे…

नवी मुंबई : खंडाळा तालुक्यातील सुखेड गावातील शेतविहिरीत आढळलेल्या मृतदेह प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना मोठं यश आले आहे. ही हत्या कळंबोलीत करून मृतदेह तब्बल १९१ किलोमीटरपर्यंत लांब नेऊन विहिरीत टाकणारा आरोपी नवी मुंबई पोलिस दलातील हवालदारच असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुखेड गावात ६ फेब्रुवारी रोजी एका शेतविहिरीत जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. या प्रकरणी लोणंद पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तीन दिवसांत या प्रकरणाचा तपास केला आहे. या तपासामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

घटनेचा तपास करत असताना पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस एका संशयित कारपर्यंत पोहोचले. बंडू भिसे या रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत हवालदारानेच मित्रांच्या मदतीने ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. भिसे हा कळंबोलीतील रोडपाली येथे राहत होता. त्याच परिसरातील सोमनाथ बोबडे याच्याशी त्याची मैत्री होती. मात्र, सोमनाथचे आपल्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय भिसे याला होता.

विजय पवार, किरण गायकवाड आणि श्रीनिवास लोणे यांना बोलावून ५ फेब्रुवारीला सोमनाथला भेटीसाठी बोलावले आणि त्याचे तोंड दाबून खून केला.
सोमनाथचा मृतदेह कारच्या पुढच्या सीटवर ठेवून स्वतः भिसे याने १९१ किलोमीटरचा प्रवास केला. अटकेनंतरही भिसे गुन्ह्याची कबुली देण्यास नकार दिला. मात्र, लोणंद पोलिसांनी त्याच्या साथीदारांना विश्वासात घेतल्यानंतर संपूर्ण घटनाक्रम उघड झाला. सहायक निरीक्षक शिवाजी जायपात्रे, उपनिरीक्षक रोहित हेगडे यांच्या पथकाने अधीक्षक तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

पुणे! प्रियकराला संपवलं पण सिग्रेट अन् दारुच्या बाटलीने अडकवलं…

मुंबईतील प्रेयसीने घरी बोलवून विवाहित प्रियकराचं कापलं गुप्तांग…

अनैतिक संबंध! पत्नीच्या प्रियकराला एकांतात बोलवले अन्…

प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याला दिलं विष दिलं अन् कुत्रं भुकू नये म्हणून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!