
भारतासमोर परदेशी नागरिकांची घुसखोरी बनली मोठी डोकेदुखी!
( अशोक इंदलकर, ashokindalkar66@gmail.com )
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारत २६ पर्यटकांचा जीव गेला. देशभरात संतापाची लाट उसळल्यानंतर सरकाराने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले. पाकिस्तानी नागरिक देश सोडून जातील सुद्धा. पण, भारतीय सीमेच्या विविध भागांमधून पाकिस्तानी, बांगलादेशी नागरिक प्रवेश करत आहेत. भारतीय हद्दीत घुसखोरी केल्यानंतर हल्ले घडवून आणतात. भारतासमोर आज बेकायदेशीर परदेशी स्थलांतरीत म्हणजे एक डोकेदुखी होऊन बसली आहे. सेवानिवृ्त पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांनी घेतलेला आढोवा…
हेच आपल्यासाठी धोकादायक…
The illegal immigrants (identification and deportation ) bill 2018 अन्वये बेकायदेशीर रहिवासी यांची व्याख्या सांगितली आहे. या सबंधीत राष्ट्रीय आयोगाने भारतात प्रवेश करने वास्तव्य करने याबाबत अटी शर्ती प्रमाणे कागदपत्रांची पुर्तता न करता किंवा कसल्याही कायदेशीर कागदपत्रा शिवाय, परवानगी शिवाय वास्तव्य करतात त्यांना बेकायदेशीर स्थलांतरीत (illegal immigrants) मानले जाते. भारतात जे परदेशी नागरिक घुसखोर आहेत त्या मध्ये विषेशतः नायजेरियन, पाकीस्थानी, बांग्लादेशी घुसखोर हे भारतासाठी धोकादायक ठरतात. नायजेरियन ड्रग्ज, ब्राऊन शुगर वगैरेंचा व्यवसाय करुन भारताची तरुण पिढी बरबाद करतात. तर पाकिस्तानी, बांग्लादेशी हे देशविघातक कामे, जातीय दंगली, खून, चोऱ्या दरोडे असली कृत्ये करतात. नायजेरियन, केनियन हे आफ्रिकी वंशाचे लोक सहज ओळखता येतात परंतु पाकिस्तानी किंवा बांगलादेशी व्यक्ती दिसायला सर्वसामान्य भारतिय लोकांसारखेच असल्याने ओळखू येणे खूप अवघड आहे. ते आपल्या जनतेत सहज मिसळतात. आणि हेच आपल्यासाठी धोकादायक आहे.
आज भारतात, महाराष्ट्रात किती तरी देशाविघातक, हिंसक घटणा घडल्या आहेत. त्यात शेकडो निरपराध लोक बळी पडले आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेकडो लोकांचे रोजगार गेले, धंदे बुडाले यास हेच घुसखोर जबाबदार आहेत. मग सर्व सामान्यांना प्रश्न पडतो की सरकार कायदे कडक करत का नाही? त्यांच्या मुसक्या आवळून त्यांना त्यांच्या देशात हाकलून का लावत नाही?. या विषारी घुसखोरीला पायबंद का घालत नाही.? प्रश्न फार सोपा आहे. पण त्याच उत्तर खूप अवघड आहे.
भारतात प्रवेश करने, निवास करने वगैरेसाठी अनेक कायदे आहेत. विदेशी अधिनियम सन १९४६ (Foreigners Act 1946) The passport (Entry into india Rules – 1950, The illegal immigrants (identification and deportation) bill 2018 वगैरे, वगैरे पण जे घुसखोर आहेत त्यांचेकडे ना ओळखपत्र असते ना कसली कागदपत्रे. अशा लोकांना पकडले तर कायदेशीर प्रक्रीया करून त्यांना त्यांच्या देशाच्या ताब्यात देण्याची प्रक्रीया केली जाते. ही झाली सर्वसाधारण प्रक्रिया पण आता आपण वास्तव काय आहे, पोलिसांची डोकेदुखी, अडचणी काय आहेत हे थोडक्यात पाहू.
फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’
पोलिसांची डोकेदुखी…
एखाद्या मोहल्यात काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्य करत आहेत अशा खात्रीशीर खबरी वरुन पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणतात. चौकशीअंती समजते की ते बांगलादेशचे रहिवाशी असून त्यांच्याकडे भारतात राहण्याचा व्हिसा पासपोर्ट हे सर्व बनावट आहे. अनेक दिवसांपासून बेकायदेशीर वास्तव्य करत आहेत. किंवा त्यांनी काही गुन्हा केला असेल तर मग पोलिस त्यांच्यावर रितसर गुन्हा दाखल करुन त्यांना कोर्टापुढे उभे करतात. कोर्ट त्या बाबात खात्री करुन घेते. आणि रितसर कोर्टाची कारवाई सुरू होते. ते जामिनावर असताना कित्येक महिणे पोलिसांना त्यांचे वर विशेष ध्यान द्यावे लागते. कोर्टकड्न आदेश घेऊन त्यांचेवर डीपोर्टेशनची कारवाई होते. बेकायदेशीर वास्तव्य करनारे व ज्यांच्या जवळ कसलीही कागदपत्र नसलेले बांग्लादेशी मिळाल्यावर पोलिसां चौकशीत ते बांगलादेशचे रहिवासी असल्याची खात्री होते. अशांना F.R.O.(foreigner’s Registration Officer) पदावरिल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या आदेशाने डिपोर्टेशनची कारवाई केली जाते. अर्थात न्यायालय किंवा वरिष्ठ पोलिसांच्या आदेशापर्यंतची प्रक्रीया लगेच होत नाही. त्याला बरेच दिवस व महिणे लागतात. तोपर्यंत पकडलेले बेकायदेशीर स्थलांतरीत हे रेस्क्यु सेंटर / डिटेंन्शन कॅम्प मधे ठेवावे ही प्रक्रीया आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे आपल्याकडे अशी सेंटर्सच अद्याप उपलब्ध नाहीत. मग पोलिस त्यांना पोलिस स्टेशन आवारात किंवा मशीदीत, धर्मशाळेत वगैरे ठेवतात. त्यांच्या राहण्याचा, बॉर्डर पर्यंत पोहोचवण्याचा खर्च मॅनेज करावा लागतो. त्यामुळे पोलिसांसाठी ही अक्षरशः डोकेदुखी ठरते. पण एवढी संवेदनशील आणि धोकादायक बाब असूनही ना शासन गंभीर ना प्रशासन.
राज्य शासनाने गांभिर्याने पाहिले पाहिजे…
आज वस्तुस्थिती अशी आहे की सरकारचा करोडो रुपयांचा कर बुडवून बडे व्यापारी, नोकरशहा, उद्योजक कोट्यावधी रुपये काळा पैसा देशा परदेशात गुंतवतात. पुण्यातच आपण पाहीले दारुच्या नशेत बडया बापाच्या पोराने लाखो रुपये किमतीच्या अत्यंत महागडया पोर्शे कारने अपघातात निष्पाप जोडप्याचा जीव घेतला तर भ्रष्ट माजी मंत्र्याच्या मुलाने मौजमजेसाठी बँकाकला जाण्यासाठी लाखो रुपये खर्च करून चार्टर विमान प्रवास सुरु केला होता. थोडक्यात काय तर या व अशा गोष्टींसाठी पैसा आहे, अशांवर ईन्कम टॅक्स, ईडी रेड लावून अब्जावधीची माया सरकार ताब्यात घेते, जप्त केले जातात मग ज्या बाबी राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत आहे त्याला शासनाकडे पैसा नाही.? अत्यंत शरमेची बाब आहे. आशादायक गोष्ट म्हणजे केंद्र शासनाने नुकतेच काही कडक कायदे केले आहेत. पण त्याच्या अंमलबजावणी आणि त्यासाठीच्या उपाययोजना याकडे राज्य शासनाने गांभिर्याने पाहिले पाहीजे.
बांगलादेशी घुसखोराबाबतचा अनुभव…
माझा अनुभव असा की मी सन १९९५ च्या दरम्यान मुंबईमधील अन्टॉप हिल पोलिस स्टेशनला सब इन्स्पेक्टर म्हणून नुकताच रुजू झालो होतो. त्यावेळी हद्दीमधील बंगाली पुरा भागातून दोन तीन बांग्लादेशी जोडपी पकडली होती. ते बेकायदेशीर स्थलांतरीत होते.आमच्या टीमने त्यांना ताब्यात घेतले व कायदेशीर प्रक्रियेनुसार कलकत्याला या कामासाठी नियुक्त विषेश पोलिस फोर्सकडे सुपुर्त केले. त्यांनी नंतर बंगाल सरकारच्या दुतावासाशी संपर्क करून त्यांचे आदेशाने संबंधीत बंगाली यंत्रणेच्या ताब्यात दिले. अशा प्रकारे डीपोर्टेशन प्रक्रीया पार पडली. मुंबईला परतन्यासाठीची ट्रेनची तिकीटे काढली होती. परंतु, ३ दिवसांनी ती तारीख होती. मग एवढा वेळ करायच काय? आम्ही मग तेथील महाराष्ट्र सदनला मुक्काम केला व कलकत्त्यामधील प्रेक्षनिय स्थळ, रविंद्रनाथ टागोरांच शांतीनिकेतन, तसेच बेलूर मठ वगैरे ठिकाणी २ दिवस मनसोक्त भटकून घेतल. आणि नंतर मजल दर मजल करत मुंबईला स्टाफ सह परतलो. एक दिवस विश्रांती घेऊन परत पोलिस स्टेशनला ड्युटीवर जॉईन झालो. आणि मला खबऱ्याने लगेच एक बातमी दिल्यावर आश्चर्याचा झटका बसला. कारण, ज्यां बंगाली घुसखोरांना आम्ही पकडून कोर्ट, सिनियर ऑफीसर, यांच्यासमोर हजर केलं होतं, ढिगभर कागदपत्र बनवून रात्रंदिवस प्रवास खर्च करुन आमचा तसेच शासनाचा पैसा खर्च केला होता. घुसखोरांना त्यांच्या देशाच्या हवाली केले होते. ते घुसखोर आम्ही यायच्या आधी परत मुंबईला बंगालीपु्-यात परतले होते. ते ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. पण आपल्या सर्वांना हे ऐकून शॉक बसेल की एवढी वर्ष झाली त्या गोष्टीला पण आजही तीच परिस्थिती आहे. थोडक्यात ‘आंधळ दळतय अन् कुत्र पिठ खातय ‘ असा प्रकार चालू आहे. कारण म्हणतात ना की कायदा गाढव आहे. नुसत्या हवेत लाथा मारतो. बेकायदेशीर स्थलांतरीत ही समस्या जगाच्या पाठीवर सगळीकडे आहे. तशी भारतातही आहे. मान्य पण हे स्थलांतरीत ईयलंच दुध पिऊन जर विष ओकत असतील तर कस व्हायच ? खूप धोकादायक व भयानक समस्या आहे. हळूहळू ही विषवल्ली वाढत चालली आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण होतो आहे. वेळीच जागं होणे गरजेचे आहे.
सन २००० साली भारताचे तत्कालीन गृहसचिव माधव गोडबोले समीतीने बांगलादेशी घुसखोरांबाबत रिपोर्ट सादर केला होता त्यात म्हटले होते की, ३ लाखांहून जास्त बांगला देशी घुसखोर बेकायदेशीर रित्या भारतात वास्तव्य करत आहेत. आज २०२५ साल आहे. हा आकडा आता किती झाला असेल? बांगलादेशी नागरिक पकडून पोलिसांनी कारवाई केल्याबाबतच्या बातम्या आपण अधूनमधून आपण ऐकत असतो. त्यापैकी काही घटना आपण पाहू.
पोर्न स्टार रिया बर्डे निघाली बांगलादेशी…
उल्हासनगर पोलिसांनी रिया बर्डे नावाच्या पोर्न स्टार युवतीला एका छाप्यात पकडले होते. तिच्या बापतीत सखोल चौकशी झाली तेव्हा जे सत्य, जे वास्तव बाहेर आले ते खूप धक्कादायक होत. कारण ती युवती बांग्लादेशी होती. अमरावतीच्या अरविंद बर्डे नावाच्या व्यक्तीने बांगला देशी घुसखोर रुबी शेख हिच्याशी विवाह केला. पश्चीम बंगालचे खोटी कागदपत्र तयार करून तीला व तीच्या ३ मुलांचे. म्हणजे बन्ना उर्फ रिया, रझा उर्फ रमेश आणि रविंद्र उर्फ रियांझ ह्यांचे रेशनकार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड बनवून अमरावतीत ते सुखनैव संसार करत होते. पोर्न स्टार रियाला पकडल्यानंतर चौकशीत पुढे या साऱ्यांना पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली गेली. वकीलांनी कायद्यामधील त्रुटी दाखवली असेल, भरपूर बिदागी घेऊन केस लढवली असेल. पुढे त्यांना डिपोर्ट केले गेलं असेल. वारी करुन ते परतही आले असतील वगैरे वगैरे. बांगलादेशातील अशा घुसखोरांना उदार मनाने आश्रय देणारा, त्यांची खोटी कागदपत्र बनवून संसार थाटणारा अमरावतीचा अरविंद बर्डे, त्याला मदत करनारे चलाख व हुषार एजंट व सरकारी यंत्रणांमधील हरामखोर आजही सुखनैव आणि ऊजळ माथ्याने समाजात वावरत असतील. हे झाले एक उदाहरण अशी शेकडो उदाहरने देता येतील.
जुन्नरच्या एका मोहल्ल्यातील उदाहरण…
पुणे जिल्ह्यामधील अगदी ताज उदाहरण म्हणजे नुकतच एप्रील मधे जुन्नरच्या एका मोहल्ल्यात विधि अकबर हुसेन नावाची माहिला तिचा नवरा शाहा आलम मंडल (मूळ काली गंज, ढाका. ) यासह बेकायदेशीर वास्तव्यास होती. खबर मिळाल्यावर तिला पोलिसांनी पकडली. तिचा नवरा फरार झाला. जे पकडले त्यांच्या कडे आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हींग लायसन, पासपोर्ट हे सर्व नकली होतं. ही झाली आपल्या महाराष्ट्रातील चार दोन उदाहरणं. परंतु, तिकडे प.बंगाल, बिहार वगैरे राज्यात तर वस्त्याच्या वस्त्या बांग्लादेशी व रोहिंग्यानी ठासून भरलेल्या आहेत.
भारतात ३ ते ५ करोड बांग्लादेशी?
लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी मोठया पोटतिडकेने सांगितले की, आजमितीला भारतात ३ ते ५ करोड बांग्लादेशी घुसखोर बेकायदेशीर वास्तव्य करत आहेत. भारताला लागून बांग्लादेश सिमा 2266 किमी आहे. सिमेवर कुंपण घालण्याच काम चालू आहे. 563 चौक्या आहेत पण अद्याप 450 किमी कुंपण घालणे बाकी आहे. डोंगराळ भाग व निबीड अरण्य, दऱ्याखोऱ्याचा टापू यामुळे तसेच स्थानिक राजकारणामुळे अडचणी येत आहेत. त्याला ममता बॅनर्जी जबाबदार आहेत वगैरे गंभीर आरोप केले. आरोप प्रत्यारोप चालू राहतील. ती राजकीय बाब झाली. पण सरकार खरोखरच गंभीर असेल तर या बाबत सखोल अभ्यास व त्यावर कठोर उपाययोजना, कडक कायदे केले गेले पाहिजेत. नुसते कायदे करून उपयोग नाही तर ठोस, सातत्यपुर्ण व कायमस्वरूपी अंमलबजावणी झाली पाहिजे. मतांवर डोळा ठेऊन असल्या घातकी लोकांना देशात पाय ठेऊ देणे म्हणजे राजद्रोहा सारखे आहे, घातकी आहे, समाजाशी, देशाशी आपण गद्दारी करतो आहे याची जाणीव काही राजकारण्यांना, नेत्यांना झाली पाहीजे.
देशाचे सच्चे नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी…
सरकार आणि पोलिस यांचीच केवळ ही जबाबदारी समजून जनतेने हात बांधून गप्प बसण्यात अर्थ नाही. कारण ही बाब गंभीर आहे, साऱ्यांचीच ती जबाबदारी आहे. समाजाने अतिशय सावध, सतर्क राहणे गरजेचे आहे. पोलिस मित्र, स्वयंसेवी संस्था एवढेच काय संभाजी ब्रिगेड, आर एस एस, बजरंग दल अशा कट्टर संघटनंनीच नव्हे तर या देशावर निष्ठा व प्रेम असनाऱ्या काही मुस्लीम संघटणा, युवक संघटणा, समाजावर प्रभाव असनारे देशाभिमानी मुस्लीम नेते यांनी स्वतःहून समोर येऊन यासाठी आपले योगदान दिले पाहिजे, पोलिसांना, सुरक्षा यंत्रणांना, सरकारला सहकार्य केले पाहिजे. मदत केली पाहिजे. कुठल्या तरी पोलिस स्टेशनने चार टाळकी पकडली त्यांच्यावर गुन्हे दाखल केले व त्यांच्या देशाच्या ताब्यात दिल यावर समाधान मानून हा विषारी, घातकी प्रश्न सुटनार नाही. यासाठी व्यापक लढा ,चळवळ उभी राहायला हवी. सर्वच पातळीवर अखंड सावधानता सतर्कता बाळगायला हवी. नाहीतर ही विषवल्ली वाढत जाऊन एक दिवस देशासमोर पुलुवामा, पहलगाम कांड सारखं भयानक संकट परत उभ करेल हे नक्की. पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला त्याचा प्रतिशोध म्हणून भारताने पाकीस्थानविरुध्द कठोर कारवाईचा धडाका सुरु केला आहे. जे पाकीस्थानी नागरिक व्हिसावर भारतात आले आहेत त्यांना तात्काळ देशाबाहेर घालवले पण त्याचबरोबर बांग्लादेश घुसखोरांवरही कारवाईचा धडाका लावला आहे. देशपातळीवर हे होत च राहील पण राञ्या राज्याच्या कानाकोपऱ्यात गल्यागल्यात हे काम होत राहील पाहीजे. देशाचे सच्चे नागरिक म्हणून प्रत्येकाची ही राष्ट्रीय जबाबदारी आहे.
‘सरफरोश’ या अमीर खानच्या पूर्वी गाजलेल्या हिंदी फिल्मचे गाजलेल्या गीताचे बोल या निमित्ताने येथे देतो.
जयहिंद!
जिंदगी मौत ना बन जाये संभालो यारो.. हो रहा चनौ अमन,
मुश्कीलो मे है वतन.. ..मुश्कीलों मे है वतन..
सर फरोशी की शमा दिल में जलालो यरो…
पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांच्या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे दिल्लीत प्रकाशन!
भगवान महादेवाने राक्षस त्रिपुराचा केलेला वध हा एक प्रकारचा एन्काऊंटरचः अशोक इंदलकर
पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांच्या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन!
अशोक इंदलकर यांची अपर पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती!
पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन…
भैय्युजी महाराज आणि रांजणगावचा हल्ला: अशोक इंदलकर
आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्लस शोभराज आणि पोलिस अधिकारी मधुकर झेंडे: अशोक इंदलकर
अशोक इंदलकरः लेखक आणि इतिहासाची आवड असणारा अधिकारी!
इतिहास पोलीस दल निर्मितीचा… (अशोक इंदलकर)
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

