
पुणे! बाणेर पोलिसांनी ७२ सीसीटीव्ही फुटेज तपासत चार आरोपींना केले जेरबंद…
पुणे (संतोष धायबर): आम्हाला तुमची झडती घेवुद्या असे म्हणून जबरदस्तीने अंगझडती घेवून मारण्याची धमकी देत खिशातील ४०,००० रुपये रोख काढून जबरी चोरी केल्याचा गुन्हा बाणेर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला होता. बाणेर पोलिसांनी ७२ सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपींना बेड्या ठोकल्या असून, पुढील तपास करत आहेत.
फिर्यादी हे त्यांचा ऑफीसमधील व्यक्तीसोबत १२/०४/२०२६ रोजी पायी जात होते. साई रेसिडेंसी समोर सुतारवाडी पुणे येथे चार अनोळखी व्यक्तींनी दोन काळ्या रंगाचे स्कुटर वरुन येत तुम्ही आमचे बँकेचे कार्ड घेतले आहे. आम्हाला तुमची झडती घेवुद्या असे म्हणून त्यांनी जबरीने अंगझडती घेवून मारण्याची धमकी देत खिशातील ४०,०००/- रुपये रोख जबरीने काढून घेतले होते. याबाबत बाणेर पोलिस स्टेशन येथे गु.र.नं. १११ / २०२६ भा. न्या. संक ३०९ (४), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
सदर गुन्हयाचे अनुषंगाने बाणेर पोलिस स्टेशनकडील तपास पथकाचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळावर मिळून आलेले सीसीटीव्ही आणि त्याच्या व्यतिरीक्त ७२ सीसीटीव्ही फुटेज चेक करुन त्याद्वारे गुन्हा करणारे आरोपी यांचा पाठलाग करुन दाखल गुन्हयातील आरोपी १) दिनेश बाळु मंडपे, वय-३३ वर्षे, रा. साई अपार्टमेन्ट मागे, आदेशनगर पिंपरी, पुणे, २) रोहन रमेश सुर्यवंशी, वय – ३१ वर्षे, रा.छोटी मस्जीद जवळ, मिलींद नगर, पिंपरी, पुणे, ३) लक्ष्मण कृष्णा वाल्हेकर वय – ४६ वर्षे रा. एम बिल्डीग आदर्शनगर, पिंपरी, पुणे, ४) संतोष राम कंपा, वय ३१ वर्षे, रा. छत्रपती हौसिंग सोसायटी मिलिंदनगर, पिंपरी पुणे यांना मिलिंदनगर, पिंपरी पुणे येथून अटक केली. त्यांचेकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता आरोपीतांनी सदर गुन्हा केल्याचे कबुल केले. अटक आरोपीकडून नमुद गुन्ह्यात वापरलेल्या दोन स्कुटर जप्त करण्यात आल्या आहे. पोलिस गुन्हयाचा अधिक तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर मनोज पाटील, पोलिस उप आयुक्त, परि. ४ चुलूमुला रजनीकांत, सहा. पोलिस आयुक्त खडकी विभाग, विठ्ठल दबडे यांचे मार्गदर्शनाखाली बाणेर पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अलका सरग यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलिस निरीक्षक के.बी डाबेराव, गणेश रायकर, पोलिस अंमलदार बाबा आहेर, किसन शिंगे, गणेश गायकवाड, अतुल इंगळे, गजानन अवातिरक, प्रदिप खरात, शरद राऊत, मराठे, भोईने, पवार यांनी केली आहे.
पुणे शहरात सलूनमध्ये अंदाधुंद गोळीबार; पोलिसांनी जिवाची पर्वा न करता घातली झडप…
पुणे! लकडी पुलावरील त्या हत्येचा छडा; दोघांना बेड्या, धक्कादायक उलगडा…
पुणे! लग्नासाठी चक्क पोलिस अधिकारी झाल्याचा बनाव! इम्प्रेशनसाठी लावले खोटे फ्लेक्स…
पुणे! वकील पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून महिला सेक्रेटरीची हत्या…
पुणे शहरात घडली हादरवून टाकणारी घटना; गुन्हा दाखल…

