लग्नासाठी कुटुंब कोल्हापुरात दाखल झाले अन् मिळाली धक्कादायक माहिती…

कोल्हापूर: फेसबुकवरील एका जाहिरातीला भुलून महाड (रायगड) येथील एका कुटुंबाला कोल्हापूर येथे आल्यानंतर मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याच्या नावाखाली या कुटुंबाकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे.

महाड येथील एका युवकाने फेसबुकवर लग्नासंदर्भात जाहिरात पाहिली होती. त्यावरून त्याने संपर्क साधला असता, पूनम पाटील नावाच्या महिलेशी त्याचे बोलणे झाले. संबंधित महिलेने एका अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचे आमिष दाखवले. या प्रक्रियेसाठी अनाथ आश्रमाच्या प्रवेश शुल्काच्या नावाखाली सुरुवातीला 6,500 रुपये आणि लग्नाची तारीख ठरल्यानंतर 7,000 रुपये असे ऑनलाइन पद्धतीने उकळले. पैसे घेऊनही संबंधित युवकाला मुलीचा फोटो दाखवण्यात आला नाही किंवा तिच्याशी बोलू दिले गेले नाही. तरीही विवाहाच्या आशेने महाडचे हे कुटुंब लग्नाच्या पूर्ण तयारीने कोल्हापुरात दाखल झाले. मात्र, कोल्हापुरात आल्यानंतर ज्या महिलेशी बोलणे झाले होते, तिचा फोन बंद येऊ लागला.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

संबंधित कुटुंबाने कोल्हापुरातील मंगळवार पेठ येथील अनाथ आश्रमात जाऊन चौकशी केली असता, त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. या आश्रमाच्या नावाने अशा अनेक तक्रारी आधीच प्राप्त झाल्याचे तेथील प्रशासनाने सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महाडच्या या कुटुंबाने तातडीने कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे धाव घेऊन तक्रारीचा अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावरील वधू-वर सूचक मंडळांची शहानिशा केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

लग्नापूर्वी होणाऱ्या पत्नीला प्लॅटवर बोलावलं अन् लैंगिक शक्तीच्या गोळीनं गेला जीव…

पुणे! लग्नासाठी चक्क पोलिस अधिकारी झाल्याचा बनाव! इम्प्रेशनसाठी लावले खोटे फ्लेक्स…

मैत्रिणीने लग्नाची पत्रिका अ्न साडी दाखवताच प्रियकराने घेतला जगाचा निरोप…

75 वर्षांच्या आजोबांचे 35 वर्षीय महिलेशी लग्न; हनिमूनच्या रात्रीच मृत्यू…

पुणे! लग्नानंतर 45 दिवसांत झाला महागडा घटस्फोट; पोटगी पाहा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!