धक्कादायक! संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीची केली हत्या अन् पुढे…

नाशिक : नाशिक शहरातील आडगाव परिसरात राहात असलेल्या एका कुटुंबामध्ये झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात मुसळी मारून हत्या केल्यानंतर पतीने स्वतःही गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

नाशिक शहरातील आडगाव परिसरात इच्छामणी नगरमध्ये सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली आहे. विशाल निवृत्ती घोरपडे (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. तर प्रिती विशाल घोरपडे (वय २७) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विशाल घोरपडे याने आपली पत्नी प्रिती ही गाढ झोपेत असतांनाच तिच्या डोक्यात मुसळी टाकत तिची हत्या केली. त्यानंतर विशाल घोरपडे याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना समजताच घोरपडे कुटुंबातील इतर सदस्य घटनास्थळी दाखल झाले. दोघांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांना धक्का बसला आहे. पण, विशाल घोरपडे यांनी पत्नीचा खून करत आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घोरपडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

विशाल याने बायको प्रीती झोपेत असताना घरात असलेल्या मुसळीने डोक्यात वार केला. यात रक्तश्राव अधिक झाल्याने तिचा मृत्यू झाला. तर त्यांनतर विशाल याने स्वतः घरात गळफास घेतला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले असून, पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, स्वामी समर्थ नगरमधील श्री चंद्र मौलेश्वर मंदिराजवळ तुळजा भवानी प्रसन्न बंगल्यातील एका खोलीत घोरपडे दाम्पत्य हे मुलगा रुद्र व आई कलाबाई यांच्या समवेत राहत होते. मागील दोन ते तीन वर्षांपासून भाडेकरू म्हणून तेथे वास्तव्यास होते. विशाल मखमलाबाद परिसरात असलेल्या एका मार्बल दुकानात मोलमजुरी व्यवसाय करायचा तर पत्नी धुणीभांडी काम करायची. पत्नी धनश्रीचे परिसरातील एका युवकाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय विशाल याला आला होता. त्यावरून दोघा पती पत्नीत या कारणावरून शाब्दिक वादही झाले होते. याच वादातून मध्यरात्रीच्या सुमारास संशयित विशाल याने त्याची पत्नी धनश्रीला ठार मारले व स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली.

विवाहित महिलेने त्रासाला कंटाळून घेतला जगाचा निरोप…

अल्पवयीन मुलाचे अपहरण करून ३० लाखांची मागणी; अडीच तासात ताब्यात…

पुणे शहरात बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीची हत्या करून मेव्हण्याची आत्महत्या…

नाशिक शहरातील हत्यासत्र सुरूच; तीन दिवसात दोन खून…

Video: नाशिक पोलिसांनी गुंडाची काढली धिंड…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!