
पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांच्या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन!
पुणेः अपर पोलिस अधीक्षक (सीआयडी, क्राईम) आणि प्रसिद्ध लेखक अशोक इंदलकर यांनी लिहीलेल्या ‘जेनिफर ऍण्ड दि बीस्ट’ या इंग्रजी पुस्तकाचे आज (मंगळवार, ता. २७) माजी पोलिस अधिकारी अशोक धिवरे यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.
ईश्वरी प्रकाशनच्या वतीने पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी सीआयडी प्रमुख अशोक धिवरे, ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस, माजी प्रधान सचिव सुनील लिमये, अपर पोलिस महासंचालक (सीआयडी) प्रशांत बुरडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुणे शहरातील पाषाण रस्त्यावर असलेल्या सीपीआर येथील सभागृहात मंगळवारी (ता. २७) सायंकाळी चार ते सात या वेळेत पुस्तकाच्या प्रकाशनाचा समारंभ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती ईश्वरी प्रकाशनचे प्रकाशक संतोष धायबर यांनी दिली.
दरम्यान, पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांची विविध विषयांवरील चार पुस्तके प्रकाशित झाली असून, एका पु्स्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या कॉन्टीनेंटल प्रकाशीत ‘युआर अंडर अॅरेस्ट या पुस्तकास प्रेरणा फाऊन्डेशनचा पुरस्कार मिळाला आहे. शिवाय, विविध वृत्तपत्रे, वेबसाईट, नियतकालिकमधून त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात. सायबर क्राईम हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. विविध गुन्हे त्यांनी उघड केले असून त्यांना पोलिस खात्याची १२५ हून अधिक बक्षीसे ५० हून अधिक प्रशस्तीपत्रके मिळाली आहेत. ‘जेनिफर ऍण्ड दि बीस्ट’ या इंग्रजी कादंबरीचे पुण्यासह कॅनडा आणि लंडनमध्येही प्रकाशन केले जाणार आहे.
दिनांक, वेळ व स्थळ
– मंगळवार, २७ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ४.०० वाजता
– सीपीआर ऑडिटोरियम, सीआयडी, पाषाण, पुणे.
पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालया समोर.
Location
https://maps.app.goo.gl/B7FeWdxZ6hdYV3zV8
अशोक इंदलकर यांची अपर पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती!
पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन…
भैय्युजी महाराज आणि रांजणगावचा हल्ला: अशोक इंदलकर
आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्लस शोभराज आणि पोलिस अधिकारी मधुकर झेंडे: अशोक इंदलकर
अशोक इंदलकरः लेखक आणि इतिहासाची आवड असणारा अधिकारी!
इतिहास पोलीस दल निर्मितीचा… (अशोक इंदलकर)
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

